सोलापूर : मागील सभेच्या इतिवृत्तांतात सदस्यांनी मांडलेले विषय व अनुपालन अहवाल नसल्याने झेडपी सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. झेडपी सभेचे इतिवृत्तान्त नोंद करणाऱ्यांनी सदस्यांनी मांडलेल्या विषयाचे नोंद का घेतले नाही असा जाब विचारण्यात आला. सदस्यांच्या या आक्षेपाला उत्तर देताना प्रशासनाची अडचण झाली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी दुपारी झेडपीची सभा झाली. सभेचे सचिव सतत का बदलता? असा सवाल अण्णासाहेब ढाणे, शिवराज मेत्रे, प्रवीण तानवडे, सविता उंबरजे या सदस्यांनी उपस्थित केला.




