सोलापूर झेडपी सभेत उजनीचे पाणी पेटले…
सोलापूर: दुष्काळी स्थितीत उजनीच्या पाण्याचे नियोजन अधीक्षक अभियंता खांडेकर यांनी सांगितल्यावर आण्णासाहेब ढाणे यांनी सीना माढा उपसा सिंचन योजनेतून कुर्डुला पाणी दिले जात नसल्याचा आरोप केला. याला योजनेचे कार्यकारी अभियंता सचिन पवार यांनी उत्तर दिले. त्यावर ढाणे यांनी कुर्डूतील शेतकरी पाकिस्तानातून आले आहेत का? असे म्हटल्यावर वाद पेटला. यावर कार्यकारी अभियंता पवार यांनी मी mpsc करून आलो आहे, असे म्हटल्यावर आणखी वादात भर पडली .



