ग्रामीण आरोग्य सेवांमध्ये हलगर्जीपणा नको; रुग्णांना वेळेत उपचार द्या!

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांची कासेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट; औषधसाठा, स्वच्छता आणि आरोग्य सुविधांची केली पाहणी

#पंढरपूर : ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेत, सुलभ आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळणे आवश्यक असून, यासाठी आरोग्य यंत्रणेने तत्परतेने काम करावे, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिले.

ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी कुशल जैन यांनी पंढरपूर तालुक्यातील कासेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन तेथील आरोग्य सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील विविध विभागांची पाहणी केली. रुग्णांना दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय सेवा, औषधसाठा, स्वच्छता, रुग्णांसाठी उपलब्ध सुविधा, केंद्रातील एकूण व्यवस्था आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची माहिती घेतली.

ग्रामीण भागातील नागरिकांना उपचारासाठी कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये. आरोग्य केंद्रात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला वेळेत आणि योग्य उपचार मिळावेत, यासाठी वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांनी संवेदनशीलतेने आणि जबाबदारीने काम करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

या पाहणी दौऱ्यावेळी गटविकास अधिकारी अमोल जाधव, कक्ष अधिकारी शहाजान तांबोळी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बोधले, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

  • Related Posts

    DCC ब्रेकिंग

    पतसंस्था आणि बँकिंग मतदारसंघात मनीष देशमुख यांचा विजय! शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांचा पराभव; जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील लक्षवेधी लढतीचा निकाल.

    अवघ्या २८ मतांनी मनीष देशमुख विजयी; अमोल शिंदे यांची कडवी झुंज!

    सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बँकिंग व पतसंस्था मतदारसंघातील चुरशीच्या लढतीत शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांचा पराभव

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    DCC ब्रेकिंग

    DCC ब्रेकिंग

    अवघ्या २८ मतांनी मनीष देशमुख विजयी; अमोल शिंदे यांची कडवी झुंज!

    अवघ्या २८ मतांनी मनीष देशमुख विजयी; अमोल शिंदे यांची कडवी झुंज!

    डीसीसी बँकेच्या निवडणुकीत भाजप प्रणित सहकार विकास पॅनलचा विजयी झेंडा ; जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 19 पैकी 18 जागांवर दणदणीत विजय..मोहिते पाटलांनी माळशिरसचा गड राखला

    जिल्हा बँकेत भाजप प्रणित सहकार विकास पॅनलचा दणदणीत विजय; १९ पैकी १८ जागांवर वर्चस्व!

    जिल्हा बँकेत भाजप प्रणित सहकार विकास पॅनलचा दणदणीत विजय; १९ पैकी १८ जागांवर वर्चस्व!

    अस्सल सोलापुरी Politics : DCC बँक निवडणूक निकालानंतर मनीष देशमुख आणि अमोल शिंदे यांची गळाभेट

    अस्सल सोलापुरी Politics : DCC बँक निवडणूक निकालानंतर मनीष देशमुख आणि अमोल शिंदे यांची गळाभेट

    डीसीसीच्या आखाड्यात देशमुखांची सरशी; शिंदे दुसऱ्या, कोंडले तिसऱ्या तर गंगदे चौथ्या क्रमांकावर!

    डीसीसीच्या आखाड्यात देशमुखांची सरशी; शिंदे दुसऱ्या, कोंडले तिसऱ्या तर गंगदे चौथ्या क्रमांकावर!