देशमुख-पाटील यांना पराभवाचा धक्का; ५० मतांच्या फरकाने मारली बाजी!
सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत माळशिरस तालुका प्रतिनिधी मतदारसंघातून अर्जुनसिंह मदनसिंह मोहिते-पाटील यांनी विजय मिळवला. त्यांनी ८३ मते मिळवत प्रतिस्पर्धी शहाजीराव देशमुख आणि ज्ञानराज पाटील यांचा पराभव केला.
या निवडणुकीत शहाजीराव देशमुख यांना ३३, तर ज्ञानराज पाटील यांना २४ मते मिळाली. मोहिते-पाटील यांनी देशमुख यांच्यावर ५० मतांनी, तर पाटील यांच्यावर ५९ मतांनी विजय मिळवला. एकूण १४१ मतपत्रिकांपैकी १४० मते वैध, तर एक मत अवैध ठरले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मोहिते-पाटील यांच्या विजयाची अधिकृत घोषणा केली.







