मतदारसंघ पुनर्रचना (Delimitation) विधेयकाला विरोध करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर कट रचल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात त्यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत विधेयकाला पाठिंबा देणाऱ्यांवरही जोरदार टीका केली.
या विधेयकाला पाठिंबा देणाऱ्यांना राऊत यांनी ‘२१व्या शतकातील सर्वात मोठे गद्दार’ असे संबोधले आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.







