‘डॉ. आंबेडकर एक चिंतन’चे थाटात प्रकाशन
सोलापूर, दि. २७ (प्रतिनिधी) – सविधानाचे न्यायिक जीवन आणि दूसरे आहे सामाजिक जीवन अशा दोन बाजू आहेत. हे सामाजिक जीवन देशातील सामान्य माणसाच्या जगण्याचा भाग आहे. या दोन्ही बाबी एकमेकावर स्वार होता कामा नयेत. अनेक प्रकरणावर न्यायालये हेरिंग घेत नाहीत. छोटे निर्णय घेऊन मोठी आणि संविधानिक दृष्टया महत्वाची प्रकरने मुद्दाम प्रलंबित ठेवले जात आहेत. सत्ता विरोधी वकीलांचे म्हणणे ऐकून सुद्धा घेतले जात नाही. संविधानावर वकिलांनी आणि न्यायाधिशांनी ताबा मारून ठेवला आहे. चुकीच्या राज्यकर्त्यांच्या ताब्यातुन जसे ते आपल्याला बाहेर काढ़ायचे आहे , तसेच ते वकील आणि न्यायाधिशांच्या ताब्यातुनही बाहेर काढले पाहिजे. असे प्रतिपादन ‘निर्भय बनो’ कार आणि ज्येष्ठ घटनातज्ज्ञ अॅड. असीम सरोदे यांनी शुक्रवारी केले.
ज्येष्ठ समाजवादी विचारवंत मधु लिमये यांनी लिहीलेल्या ‘डॉ. आंबेडकर एक चिंतन’ या ऐतिहासिक ग्रंथाच्या प्रा. डॉ. एम. डी. शिंदे यांनी केलेल्या मराठीतील अनुवादीत आवृत्तीच्या प्रकाशन सोहल्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे होते.
यावेळी मंचावर आंबेडकर विचारवंत दत्ता गायकवाड, ज्येष्ठ समाजवादी विचारवंत प्राचार्य नरेश बदनोरे, ज्येष्ठ उद्योजक दत्ताअण्णा सुरवसे, कॉंग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे, अनुवादक प्रा. डॉ. एम. डी. शिंदे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीदास सोनकवड़े, उपाध्यक्ष गीता अमोल शिंदे, विश्वस्त नागनाथ सोनकवड़े, सचिदानंद व्हटकर, दत्ता थोरे, एड. गोविंद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी सर्व पाहण्यांच्या हस्ते “डॉ. आंबेडकर एक चिंतन ” या पुस्तकाचे प्रकाशन झाले. पुढे बोलताना एड. असीम सरोदे म्हणाले की, सांविधान किती पानाचे आहे ? किती कलमांचे आहे ? हे महत्वाचे नाही तर त्यातला आशय महत्वाचे आहे. सांविधान हे जिवंत डॉक्यूमेंट आहे. जगातील उत्तमातल्या ऊत्तम गोष्ठी घेतल्या आहेत. भारतातील संघर्षाचा मोठा वारसा आहे, हेच मधु लिमये यांनी डॉ. आंबेडकर एक चिंतन या पुस्तकात लिहिले आहे. इंदिरा गांधी यांनी आणिबाणीच्या माध्यमातून सांविधानाचा गळा घोटला होता. पण त्यांचे मोठेपण असे की देशातील दोन मोठ्या सभांमधुन जाहिर माफी मागितली. हे त्यांचे मोठेपण ही होते. आज लोकशाहीचे सोंग पांघरुण लोकशाही नष्ठ करण्याचे काम देशात चालू आहे. आज आंबेडकरांचे नाव घेऊन चारोळी करीत सामाजिक न्याय देता येणार नाही. ११ मूलभूत कर्तव्य महत्वाची आहेत. नागरिकांनी ही कर्तव्य पाळली पाहिजेत. कानामध्ये आणि डोळ्यांमध्ये चार बोटाचे अंतर आहे. म्हणून आपल्याकडे कानाने ऐकले त्यापेक्षा डोळ्यांनी पाहन्याला महत्त्व होते. पण नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी देशात 2014 पासून राजकारणाचा दृश्यम सिनेमा सुरु केला आहे. दृश्यम मधील हीरो प्रमाणे आपल्याला हवे तेच भाषण, टीव्ही आणि सर्व सोशल माध्यमातून सांगतात. आणि वारंवार तेच तेच सांगत राहतात. त्यामुळे ते लोकांना त्यांचे खोटे ही खरे वाटते आहे.
यावेळी सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारख्या विद्वान माणसाने देशाला सांविधान दिले आहे, त्याचे आपण जतन केले पाहिजे. डॉ. मधु लिमये यांनी आंबेडकर यांचे कर्तुत्व शब्दबद्ध केले आणि प्रा. एम. डि. शिंदे यांनी ऊत्तम अनुवाद तर सोनकवड़े गुरुजी प्रतिष्ठानने प्रकाशित करून इतिहासाच्या स्मृती जागावल्याचे सांगितले.
यावेळी अनुवादक एम. डि. शिंदे यांनी, दत्ता गायकवाड़, प्राचार्य नरेश बदनोरे यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले. दत्ता थोरे यांनी प्रस्ताविक केले. एड गोविंद पाटील यांनी पाहुन्यांचा परिचय करून दिला. वसुंधरा शर्मा यांनी सूत्रसंचालन केले तर सचिदानंद व्हटकर यांनी आभार मानले.







