सीईओ कुशल जैन यांचा दणका! गैरहजर शिक्षकावर तात्काळ कारवाईचे आदेश

‘ड’ श्रेणीतील शाळांच्या पाहणीदरम्यान शिक्षक गैरहजर; शिंदेवाडी, कासेगाव शाळांचा घेतला शैक्षणिक आढावा

पंढरपूर : शाळेच्या पाहणीदरम्यान शिक्षक गैरहजर आढळल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी संबंधित शिक्षकावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पाहणीवेळी हा प्रकार समोर आला. शिक्षकांची अनियमित उपस्थिती आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबाबत कोणतीही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.

जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावून ‘ड’ श्रेणीतील शाळांना प्रगत श्रेणीत आणण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी पंढरपूर तालुक्यातील शिंदेवाडी आणि कासेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी त्यांनी शाळांमधील शैक्षणिक वातावरण, विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती, भौतिक सुविधा, उपलब्ध शैक्षणिक साहित्य आणि अध्यापन प्रक्रियेचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी शिक्षकांनी अध्यापनात नावीन्यपूर्ण उपक्रम राबवावेत. विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमतेत सुधारणा घडवून आणण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या.

‘ड’ श्रेणीतील शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी केवळ कागदोपत्री पूर्तता न करता प्रत्यक्ष वर्गातील अध्यापन, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती आणि शिक्षकांची नियमित उपस्थिती यावर भर देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

या पाहणी दौऱ्यावेळी गटविकास अधिकारी अमोल जाधव, कक्ष अधिकारी शहाजान तांबोळी, गटशिक्षणाधिकारी रोहन कांबळे यांच्यासह संबंधित अधिकारी आणि मुख्याध्यापक उपस्थित होते.

  • Related Posts

    DCC ब्रेकिंग

    पतसंस्था आणि बँकिंग मतदारसंघात मनीष देशमुख यांचा विजय! शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांचा पराभव; जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील लक्षवेधी लढतीचा निकाल.

    अवघ्या २८ मतांनी मनीष देशमुख विजयी; अमोल शिंदे यांची कडवी झुंज!

    सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बँकिंग व पतसंस्था मतदारसंघातील चुरशीच्या लढतीत शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांचा पराभव

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    DCC ब्रेकिंग

    DCC ब्रेकिंग

    अवघ्या २८ मतांनी मनीष देशमुख विजयी; अमोल शिंदे यांची कडवी झुंज!

    अवघ्या २८ मतांनी मनीष देशमुख विजयी; अमोल शिंदे यांची कडवी झुंज!

    डीसीसी बँकेच्या निवडणुकीत भाजप प्रणित सहकार विकास पॅनलचा विजयी झेंडा ; जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 19 पैकी 18 जागांवर दणदणीत विजय..मोहिते पाटलांनी माळशिरसचा गड राखला

    जिल्हा बँकेत भाजप प्रणित सहकार विकास पॅनलचा दणदणीत विजय; १९ पैकी १८ जागांवर वर्चस्व!

    जिल्हा बँकेत भाजप प्रणित सहकार विकास पॅनलचा दणदणीत विजय; १९ पैकी १८ जागांवर वर्चस्व!

    अस्सल सोलापुरी Politics : DCC बँक निवडणूक निकालानंतर मनीष देशमुख आणि अमोल शिंदे यांची गळाभेट

    अस्सल सोलापुरी Politics : DCC बँक निवडणूक निकालानंतर मनीष देशमुख आणि अमोल शिंदे यांची गळाभेट

    डीसीसीच्या आखाड्यात देशमुखांची सरशी; शिंदे दुसऱ्या, कोंडले तिसऱ्या तर गंगदे चौथ्या क्रमांकावर!

    डीसीसीच्या आखाड्यात देशमुखांची सरशी; शिंदे दुसऱ्या, कोंडले तिसऱ्या तर गंगदे चौथ्या क्रमांकावर!