मिळकतकर थकबाकीपोटी कारवाई; ३ दिवसांत ३१ लाख ३६ हजार ३६५ रुपयांची थकबाकी समोर
#सोलापूर : मिळकतकराची थकबाकी वसूल करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेने आता कठोर पावले उचलली आहेत. वारंवार नोटिसा देऊनही थकबाकी न भरणाऱ्या मिळकतधारकांच्या १२ मिळकतींना महापालिकेच्या कर विभागाने सील ठोकले आहे. २०, २६ आणि २७ नोव्हेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली. या मिळकतींकडे एकूण ३१ लाख ३६ हजार ३६५ रुपयांची थकबाकी असल्याचे समोर आले आहे.
#महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी मिळकतकर वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. थकबाकीदारांना यापूर्वी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कारवाईचा इशारा देण्यात आला होता. तसेच संबंधित मिळकतधारकांना नोटिसाही बजावण्यात आल्या होत्या. मात्र, अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने अधिनियमातील तरतुदीनुसार सील करण्याची कारवाई करण्यात आली.
कोणत्या मिळकतींवर झाली कारवाई?
शंकर विठ्ठल कामटे (कुमठे) – १ लाख ३४ हजार ३९९ रुपये.
रियाजोद्दीन जहीरोद्दीन मणुरकर (मजरेवाडी) – १ लाख १५ हजार १ रुपये.
व्ही. रामकृष्ण नायडू (गोल्डफिंच पेठ) – २ लाख ८६ हजार ४९० रुपये.
अंजनय्या हणमंतू कोंगारी (पूर्व मंगळवार पेठ) – ७ लाख २८४ रुपये.
रविंद्र सिद्राम बागदुरे (बुधवार पेठ) – ३ लाख २९ हजार ८२७ रुपये.
दिगंबर बाबू भिंगारे (बुधवार पेठ) – १ लाख ९३ हजार १०३ रुपये.
परशुराम गणपतराव हिंगारे (दक्षिण सदर बाजार) – १ लाख ९१ हजार ४५८ रुपये.
* सिद्राम दौलप्पा कावळे (उत्तर सदर बाजार) – ४ लाख ७४८ रुपये.
* श्रीमद् वीरशैव महासभा (ट्रस्ट), सोलापूर – ६ लाख ५७ हजार ३२० रुपये.
* सिद्धाराम शिवराय व्हनमाने (सोरेगाव) – १ लाख ८९ हजार २६३ रुपये.
* सुनील विश्वनाथ शिंदे (सोरेगाव) – १ लाख ३८ हजार ४७२ रुपये.
#थकबाकी भरल्यानंतरच सील उघडणार!
#थकीत मिळकतकराची संपूर्ण रक्कम भरल्यानंतरच सील उघडण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सर्व मिळकतधारकांनी आपली थकीत रक्कम तातडीने भरून महापालिकेला सहकार्य करावे आणि पुढील कठोर कारवाई टाळावी, असे आवाहन कर विभागाकडून करण्यात आले आहे.







