विनापरवाना वीटभट्टी चालवणाऱ्यांना महसूलचा दणका

*21.69 लाखांचा दंड*

*छावा संघटनेच्या तक्रारीवर तहसीलदार निलेश पाटील यांची कारवाई*

सोलापूर : सोलापुरातील अक्कलकोट रोड MIDC परिसरातील नागरी वसाहतीमध्ये अनेक विनापरवाना वीट भट्ट्या चालू असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून वीटभट्ट्या नष्ट करण्याबाबत राष्ट्रीय छावा संघटनेने उत्तरचे तहसीलदार निलेश पाटील आणि सोलापूर जिल्हा खनीकर्म अधिकारी यांच्याकडे लिखित तक्रार दिली होती.

अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरात अनेक अनधिकृत व बेकायदेशीर वीट भट्ट्या सुरू असून, तेथे हजारो ब्रास माती साठवून ठेवलेली आहे, आणि लाखो विटांचा साठा उपलब्ध आहे. अनेक वीट भट्टी चालक विनापरवाना वीट भट्टी चालवत आहेत. तसेच भरलेल्या रॉयल्टी पेक्षा अधिक माती साठवून ठेवलेली आहे. वीट भट्टी चालकांनी प्रदूषण मंडळाची परवानगी घेतलेली नाही, विटा वाहतूक करण्यासाठी वाहतूक परवाना घेतलेला नाही. नागरी वसाहतीमधील वीट भट्ट्यामुळे वायु प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असून, नागरिकांना त्वचेचे आणि डोळ्याचे विकार होत आहेत.

त्यामुळे अशा अनधिकृत आणि बेकायदेशीर चालणाऱ्या वीट भट्ट्यांवर कारवाई करून गुन्हे दाखल करण्याची तक्रार राष्ट्रीय छावा संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पारवे, जिल्हा उपाध्यक्ष गणेश मोरे, उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष रतिकांत पाटील यांनी केली होती.

*तक्रारीच्या अनुषंगाने केलेला पंचनामा*

पंचनामा करताना मंडल अधिकारी आणि तलाठी यांना अनधिकृत मातीचा साठा, अनधिकृत वाहतूक, महसूल परवाना, भरलेल्या रॉयल्टीच्या पावत्या आढळून आल्या नाहीत. तसेच मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन झाल्याचे दिसून आले. त्यामुळे वीट भट्टी चालकांवर खालील प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

*दंड झालेल्यांची यादी

– *1)* वीरेश आवटे – 1,33,725 रुपये

– *2)* संतोष मोहरकर – 1,67,025 रुपये

– *3)* अशोक होनमाने – 1,33,725 रुपये

– *4)* बसवराज पाटील – 3,33,525 रुपये

– *5)* ओमकार दीक्षित – 1,67,025 रुपये

– *6)* सुनील तंबाके – 6,66,525 रुपये

– *7)* चांद नदाफ – 1,33,725 रुपये

– *8)* श्रीशैल कुंभार – 2,66,925 रुपये

– *9)* परशुराम वाघमारे – 1,67,025 रुपये

*एकूण 9 वीट भट्टी चालकांना एकूण 21,69,225 रुपयांचा दंड उत्तरचे तहसीलदार निलेश पाटील यांनी केला आहे.

  • Related Posts

    वेंकटेश्वर देवस्थानच्या ५४ व्या ब्रह्मोत्सवाचा उत्साहात समारोप सूर्यप्रभा, चंद्रप्रभा वाहनसेवा आणि चक्रस्नानम् विधींनी भाविकांना भक्तिरसाची अनुभूती

    सोलापूर : पूर्व भागातील दाजी पेठ येथील श्री वेंकटेश्वर देवस्थानात गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या ५४ व्या ब्रह्मोत्सवाचा रविवारी (दि. २२) धार्मिक विधी आणि भक्तिमय वातावरणात उत्साहात समारोप झाला. शेवटच्या…

    संगीतकार डॉ. सलील कुलकर्णींचा संगीत प्रवास अन सुरेल गाणी ऐकत प्रिसिजन गप्पांचा थाटात समारोप

    रसिकांच्या गर्दीने हुतात्मा स्मृती मंदिर तुडुंब : सभागृहाबाहेरही प्रचंड गर्दी जयमाला शिलेदारांनी स्वतः बोलावून शिकवलेले गाणे, प्रत्यक्ष पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी कवितेवर बोलायला दिलेली संधी, स्वतःचे च गाणे गाताना सुधीर…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    वेंकटेश्वर देवस्थानच्या ५४ व्या ब्रह्मोत्सवाचा उत्साहात समारोप सूर्यप्रभा, चंद्रप्रभा वाहनसेवा आणि चक्रस्नानम् विधींनी भाविकांना भक्तिरसाची अनुभूती

    वेंकटेश्वर देवस्थानच्या ५४ व्या ब्रह्मोत्सवाचा उत्साहात समारोप सूर्यप्रभा, चंद्रप्रभा वाहनसेवा आणि चक्रस्नानम् विधींनी भाविकांना भक्तिरसाची अनुभूती

    संगीतकार डॉ. सलील कुलकर्णींचा संगीत प्रवास अन सुरेल गाणी ऐकत प्रिसिजन गप्पांचा थाटात समारोप

    संगीतकार डॉ. सलील कुलकर्णींचा संगीत प्रवास अन सुरेल गाणी ऐकत प्रिसिजन गप्पांचा थाटात समारोप

    *कडेवर मूल घेऊन आई रांगेत; शिक्षणाधिकाऱ्यांनी केलं असं काही…*

    *झेडपीत कोण कोणाचा पाहुणा नाही; प्रशासकीय कामकाजात चुका करणाऱ्या आरबळे यांच्यावर कारवाई होणारच*

    सीना- माढा सिंचन योजनेचे अभियंता पवार म्हणाले mpsc करून आलो..

    फार्मासिस्ट लीना पुजारी यांच्यावर कारवाईचे आदेश… दुष्काळी परिस्थितीवर आदिनाथ देशमुख यांनी याकडे वेधले लक्ष