सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत सांगोला तालुका प्रतिनिधी मतदारसंघातून बाबासाहेब आण्णासाहेब देशमुख यांनी विजय मिळवला. त्यांनी ६० मते मिळवत प्रतिस्पर्धी संजय गणपती इंगोले यांचा ४५ मतांनी पराभव केला. इंगोले यांना १५ मते मिळाली. या मतदारसंघात एकूण ८० मतपत्रिका आढळल्या. त्यापैकी ७५ मते वैध, तर ५ मते अवैध ठरली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी देशमुख यांच्या विजयाची अधिकृत घोषणा केली.







