सोलापूर – शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक जयंतीनिमित्त मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडतर्फे अंत्रोळीकर नगर येथील गुरूद्वारात गुरुग्रंथास पुष्प व फळ अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अभिवादनानंतर शिख आणि मुस्लिम बांधवांनी एकत्र लंगर घेतले.
प्रामाणिक कष्ट करून खावा, या कमाईतून सर्वांना सोबत घेऊन खावा, स्वतःबरोबर इतरांचा पण विचार करा, ईश्वर एकच असून आपण सर्व ईश्वराचीच लेकरे आहोत. त्यामुळे आपापसात भेद करू नकात असा मोलाचा संदेश सर्व समाजाला देणारे गुरुनानक होते, असे मत माजी महापौर अरिफ शेख यांनी व्यक्त केले.
या अभिवादन सोहळ्यास गुरूद्वार प्रमुख ग्यानी रमेश सिंघ, राजू सिंघ, माजी महापौर अरिफ शेख, शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान, जिल्हाध्यक्ष म. शफीक रचभरे, राम गायकवाड, पोपट भोसले, बशीर सय्यद, लक्ष्मण भोसले, जावेद बद्दी, हुजेर बागवान, कादर भागानगरी, तन्वीर गुलजार, गफूर शेख, शब्बीर फुलमामडी, रुस्तुम शेख, रिजवान दंडोती, हारिस शेख, सरफराज काझी, तन्वीर शेख, मोहसीन शेख, इरफान बागवान, जैद बागवान आदी बांधव उपस्थित होते.







