कार्तिक पौर्णिमेनिमित्त छत्रपती शिवरायांच्या चरणी दीपोत्सव; शेकडो पणत्यांनी उजळले शिवस्मारक

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सोलापूर विभागाचा उपक्रम; शिवभक्तांचा उत्स्फूर्त सहभाग

सोलापूर : शिवभक्तांची लगबग, शेकडो मिणमिणत्या पणत्यांचा प्रकाश आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष अशा भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात मंगळवारी कार्तिक पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव साजरा करण्यात आला. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सोलापूर विभागाच्या वतीने रंगभवन येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात या दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तिरुमलाई येथील शिवमंदिराचा जीर्णोद्धार करून दीपोत्सव साजरा केला होता. या ऐतिहासिक स्मृतीला उजाळा देण्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे दरवर्षी हा दीपोत्सव आयोजित केला जातो.

कार्यक्रमाची सुरुवात प्रेरणामंत्राने झाली. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर महाराजांच्या मूर्ती परिसरात धारकऱ्यांनी शेकडो पणत्या प्रज्वलित केल्या. एकाचवेळी उजळलेल्या पणत्यांच्या प्रकाशाने महाराजांची मूर्ती आणि संपूर्ण उद्यान परिसर उजळून निघाला. यावेळी शिवभक्तांनी जयघोष करत दीपोत्सवाचा उत्साह द्विगुणित केला.

ध्येयमंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सोलापूर विभागाचे धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो ओळ : कार्तिक पौर्णिमेनिमित्त रंगभवन येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे आयोजित दीपोत्सवात शेकडो पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या.

  • Related Posts

    मी स्वतः रेशन दुकानदाराचा मुलगा’; पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे भावनिक वक्तव्य

    “मी स्वतः एका रेशन दुकानदाराचा मुलगा आहे आणि हे सांगण्यास मला कधीही लाज वाटत नाही. रेशन दुकानदारांच्या सर्व अडचणी आणि समस्या मला माहिती आहेत. येणाऱ्या काळात जिल्हा बँकेच्या माध्यमातून रेशन…

    वारी विठुरायाची, काळजी आपल्या आरोग्याचा* *कार्तिकी वारीतील महाआरोग्य शिबिराचा विक्रमी प्रतिसाद

    पंढरपूरच्या ६५ एकर परिसरात १६,४३३ वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी; १०,३२८ वारकऱ्यांना मोफत चष्म्यांचे वाटप पंढरपूर / सोलापूर, दि. २३ नोव्हेंबर २०२६ : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कार्तिकी वारी २०२६…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    मी स्वतः रेशन दुकानदाराचा मुलगा’; पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे भावनिक वक्तव्य

    मी स्वतः रेशन दुकानदाराचा मुलगा’; पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे भावनिक वक्तव्य

    कार्तिक पौर्णिमेनिमित्त छत्रपती शिवरायांच्या चरणी दीपोत्सव; शेकडो पणत्यांनी उजळले शिवस्मारक

    कार्तिक पौर्णिमेनिमित्त छत्रपती शिवरायांच्या चरणी दीपोत्सव; शेकडो पणत्यांनी उजळले शिवस्मारक

    वारी विठुरायाची, काळजी आपल्या आरोग्याचा* *कार्तिकी वारीतील महाआरोग्य शिबिराचा विक्रमी प्रतिसाद

    वारी विठुरायाची, काळजी आपल्या आरोग्याचा* *कार्तिकी वारीतील महाआरोग्य शिबिराचा विक्रमी प्रतिसाद

    #मराठीतून तेलुगू लिहिण्या-वाचण्याचे धडे; १४ सत्रांच्या कार्यशाळेचा उत्साहात समारोप**

    #मराठीतून तेलुगू लिहिण्या-वाचण्याचे धडे; १४ सत्रांच्या कार्यशाळेचा उत्साहात समारोप**

    डॉ. अनुपम शहा यांना पितृशोक

    डॉ. अनुपम शहा यांना पितृशोक

    पश्चिम विभागीय पुरुष लॉन टेनिस स्पर्धेत मणिपाल विद्यापीठ, जयपूर विजेता

    पश्चिम विभागीय पुरुष लॉन टेनिस स्पर्धेत मणिपाल विद्यापीठ, जयपूर विजेता