#मराठीतून तेलुगू लिहिण्या-वाचण्याचे धडे; १४ सत्रांच्या कार्यशाळेचा उत्साहात समारोप**

#प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण; तेलुगू भाषा वर्ग निरंतर सुरू ठेवण्याचा मान्यवरांचा आग्रह**

सोलापूर : मराठी भाषेच्या माध्यमातून तेलुगू लिहिण्या-वाचण्याचे कौशल्य आत्मसात करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या १४ सत्रांच्या मोफत कार्यशाळेचा सांगता समारंभ व प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहात पार पडला. पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालय आणि हृदय स्पर्श बहुउद्देशीय समाजसेवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. रविवार पेठेतील कन्ना चौक परिसरातील पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयात रविवारी (दि. २२) हा कार्यक्रम झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष पांडुरंग दिड्डी होते. विधिज्ञ तथा पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड. श्रीनिवास क्यातम, आधुनिक सारथी मासिकाचे संपादक तथा ब्रावो किड्स व प्रिसिजन इंग्लिश मीडियम स्कूलचे सीईओ श्रीनिवास बुरा, कूचन प्रशालेचे सेवानिवृत्त तेलुगू शिक्षक प्रभाकर भिमनाथ यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यशाळेचे मार्गदर्शक काशिनाथ गंजी, वाचनालयाचे कार्यवाह अरविंद चिन्नी, तेलुगू-मराठी साहित्य संस्थेचे संस्थापक नरेंद्र गुंडेली उपस्थित होते.

प्रारंभी प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. श्रीरंग रेगोटी यांनी प्रास्ताविकातून कार्यशाळेचा उद्देश आणि उपक्रमाची पार्श्वभूमी स्पष्ट केली. यावेळी प्रशिक्षणार्थींनी आपल्या मनोगतातून कार्यशाळेतील अनुभव कथन केले. शिक्षकांची शिकवण्याची सोपी पद्धत, वैयक्तिक मार्गदर्शन, नियमित गृहपाठ आणि डिजिटल माध्यमातून मिळणारा प्रतिसाद यामुळे तेलुगू भाषा शिकणे सहज शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.

देविदास कोनापुरे यांनी शिक्षकांच्या वैयक्तिक लक्ष देण्याच्या पद्धतीचे कौतुक केले. ॲड. आनंद गोगी यांनी आता हैदराबादला गेल्यानंतर बसचे मार्ग विचारण्याइतका आत्मविश्वास निर्माण झाल्याचे सांगितले. ॲड. विजयकुमार जाधव यांनी नियमित सरावामुळे तेलुगू वाचन शक्य झाल्याचे सांगत दररोज ऑनलाइन ‘साक्षी’ वृत्तपत्र वाचत असल्याचे नमूद केले. ॲड. विलास गुदपे यांनी सोलापूर-हैदराबाद प्रवासात फलक वाचता येत असल्याचा आनंद व्यक्त केला.

चंद्रम्मा दोमल व सोनाली येमूल यांनी पूर्वी तेलुगू बोलता येत होते; मात्र लिहिता-वाचता येत नव्हते. कार्यशाळेमुळे ही उणीव दूर झाल्याचे सांगत वाचनालयात तेलुगू वृत्तपत्रे व पुस्तके उपलब्ध करून देण्याची मागणी केली. भास्कर चिप्पा यांनी हा उपक्रम भाषाशिक्षणासोबत संस्कृती आणि अनुभवांची ओळख करून देणारा ठरल्याचे सांगितले. छत्रपती संभाजीनगरहून अनिलकुमार सोनवणे आणि पुण्यातून मीरा घोगरे यांनी व्हॉट्सॲप समूह व डिजिटल नोट्सच्या माध्यमातून तेलुगू शिकण्याचा अनुभव मांडला.

तेलुगू भाषा वर्ग दर रविवारी सुरू ठेवावेत : ॲड. श्रीनिवास क्यातम

मराठी जाणणाऱ्या व्यक्तींना तेलुगू भाषा शिकणे तुलनेने सोपे आहे. मराठी आणि तेलुगू लिपीमध्ये काही साम्य असल्याने दररोज किमान एक पान तेलुगू वाचण्याचा सराव करावा, असे आवाहन ॲड. श्रीनिवास क्यातम यांनी केले. तेलुगू भाषेचे माधुर्य, गोडवा आणि समृद्ध साहित्यसंपदा यांचे कौतुक करत सोलापुरात तेलुगू शिकण्याचे वर्ग दर रविवारी सातत्याने सुरू राहावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

प्रभाकर भिमनाथ यांनी तेलुगू बालभारती पुस्तकांच्या अभ्यासातून भाषा आत्मसात करण्याचे महत्त्व सांगितले. श्रीनिवास बुरा यांनी विविध क्षेत्रांतील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले. आगामी उन्हाळी सुट्टीत आपल्या शाळेत किमान १०० विद्यार्थ्यांसाठी तेलुगू भाषा वर्ग सुरू करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

वाचनालयाचे विश्वस्त अशोक इंदापूरे यांनी प्रशिक्षणार्थींचा प्रतिसाद पाहता हा उपक्रम निरंतर सुरू राहील, अशी ग्वाही दिली. काशिनाथ गंजी, श्रीरंग रेगोटी, गौरीशंकर दिकोंडा आणि गोपीकृष्ण वड्डेपल्ली यांनी कुटुंब व नोकरी सांभाळून निरपेक्ष भावनेने केलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक केले. वाचनालयात तेलुगू वाचकांची संख्या वाढल्यास तेलुगू दैनिके, पाक्षिके आणि मासिके उपलब्ध करून देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय मनोगतात पांडुरंग दिड्डी यांनी सांगितले की, गेल्या १५ वर्षांपासून मे महिन्यात तेलुगू भाषेचे वर्ग घेतले जात होते; मात्र त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. हृदय स्पर्श संस्थेच्या सहकार्याने फेब्रुवारीत सुरू केलेल्या वर्गाच्या पहिल्याच दिवशी सभागृह पूर्ण भरले. सर्व जाती-धर्मांतील आणि विविध क्षेत्रांतील नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घेतला. नव्याने सुरू झालेल्या या उपक्रमाला वाचनालयाचे नेहमीच सहकार्य राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यशाळा यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सिद्धेश्वर विजापूरे, लखन मिठ्ठा आणि ग्रंथपाल रमा इप्पनपल्ली यांनी सहकार्य केले. श्रीरंग रेगोटी यांनी आभार मानले, तर गौरीशंकर दिकोंडा यांनी सूत्रसंचालन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

  • Related Posts

    मी स्वतः रेशन दुकानदाराचा मुलगा’; पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे भावनिक वक्तव्य

    “मी स्वतः एका रेशन दुकानदाराचा मुलगा आहे आणि हे सांगण्यास मला कधीही लाज वाटत नाही. रेशन दुकानदारांच्या सर्व अडचणी आणि समस्या मला माहिती आहेत. येणाऱ्या काळात जिल्हा बँकेच्या माध्यमातून रेशन…

    कार्तिक पौर्णिमेनिमित्त छत्रपती शिवरायांच्या चरणी दीपोत्सव; शेकडो पणत्यांनी उजळले शिवस्मारक

    श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सोलापूर विभागाचा उपक्रम; शिवभक्तांचा उत्स्फूर्त सहभाग सोलापूर : शिवभक्तांची लगबग, शेकडो मिणमिणत्या पणत्यांचा प्रकाश आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष अशा भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात मंगळवारी कार्तिक पौर्णिमेनिमित्त…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    मी स्वतः रेशन दुकानदाराचा मुलगा’; पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे भावनिक वक्तव्य

    मी स्वतः रेशन दुकानदाराचा मुलगा’; पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे भावनिक वक्तव्य

    कार्तिक पौर्णिमेनिमित्त छत्रपती शिवरायांच्या चरणी दीपोत्सव; शेकडो पणत्यांनी उजळले शिवस्मारक

    कार्तिक पौर्णिमेनिमित्त छत्रपती शिवरायांच्या चरणी दीपोत्सव; शेकडो पणत्यांनी उजळले शिवस्मारक

    वारी विठुरायाची, काळजी आपल्या आरोग्याचा* *कार्तिकी वारीतील महाआरोग्य शिबिराचा विक्रमी प्रतिसाद

    वारी विठुरायाची, काळजी आपल्या आरोग्याचा* *कार्तिकी वारीतील महाआरोग्य शिबिराचा विक्रमी प्रतिसाद

    #मराठीतून तेलुगू लिहिण्या-वाचण्याचे धडे; १४ सत्रांच्या कार्यशाळेचा उत्साहात समारोप**

    #मराठीतून तेलुगू लिहिण्या-वाचण्याचे धडे; १४ सत्रांच्या कार्यशाळेचा उत्साहात समारोप**

    डॉ. अनुपम शहा यांना पितृशोक

    डॉ. अनुपम शहा यांना पितृशोक

    पश्चिम विभागीय पुरुष लॉन टेनिस स्पर्धेत मणिपाल विद्यापीठ, जयपूर विजेता

    पश्चिम विभागीय पुरुष लॉन टेनिस स्पर्धेत मणिपाल विद्यापीठ, जयपूर विजेता