आईच्या त्यागाचा सन्मान हेच क्रीडा भारतीचे ध्येय : राजजी चौधरी

क्रीडा भारती सोलापूरतर्फे आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या मातांचा ‘वीर जिजामाता’ पुरस्काराने सन्मान

डॉ. विलास हारपाळे यांना जीवन गौरव

​सोलापूर : खेळाच्या माध्यमातूनच सशक्त राष्ट्र उभे राहील, हा विचार घेऊन क्रीडा भारती केवळ निवडक खेळाडूंसाठी नव्हे, तर समाजातील प्रत्येक घटकाला खेळाची संधी आणि जगण्याबरोबरच खेळाचा अधिकार मिळावा, यासाठी कार्यरत आहे. जिजाऊंच्या विचारांप्रमाणे प्रत्येक आईने आपल्या मुला-मुलीमध्ये देशभक्तीचा संस्कार रुजवावा. आईच्या त्यागाचा सन्मान करण्याचे काम क्रीडा भारती करत असल्याचे प्रतिपादन क्रीडा भारतीचे अखिल भारतीय महामंत्री राजजी चौधरी यांनी केले.

क्रीडा भारती सोलापूरच्या वतीने देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठित ‘वीर जिजामाता क्रीडा पुरस्कारा’चे वितरण आंतरराष्ट्रीय लॉन टेनिसपटू संध्याराणी बंडगर, आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आश्लेषा बागडे तसेच लांब पल्ल्याच्या धावपटू साईश्वर व श्रद्धा गुंटूक यांच्या मातांना प्रदान करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. कबड्डी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे क्रीडा संघटक डॉ. विलास हारपाळे यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच विविध खेळातील प्रशिक्षकांचाही विशेष सत्कार करण्यात आला.

​शिंदे चौक येथील शिवस्मारक हॉलमध्ये पार पडलेल्या या सोहळ्यास शिक्षण प्रसारक मंडळी शाळा समितीचे अध्यक्ष सुरेशबाबू मंकणी, क्रीडा भारती पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विजय पुरंदरे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर म्याकल, प्रांत मंत्री हरीश अनगोळकर आणि ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. प्रदीपसिंह राजपूत यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थितांचे स्वागत क्रीडा भारती सोलापूरचे मंत्री राजेश कळमणकर, जिल्हा संघटन सहमंत्री अरुण उपाध्ये, डॉ. उज्वल मलजी आणि अविनाश जाधव यांनी केले.

​ कार्यक्रमापूर्वी सर्व पुरस्कारार्थींना फेटे बांधून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुकीने समारंभस्थळी आणण्यात आले. समर्थ कबड्डी क्लबच्या खेळाडूंनी पुष्पवृष्टी करून त्यांचे भव्य स्वागत केले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली, तर शिवसृष्टीने सांगता करण्यात आली.

क्रीडा ज्ञान परीक्षेतील तृतीय शर्वरी धमशेट्टी सन्मानित क्रीडा भारतीच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पातळीवरील क्रीडा ज्ञान परीक्षेत तृतीय क्रमांक पटकाविलेल्या होटगी रोडवरील महिला होमिओपेथिक महाविद्यालयाच्या शर्वरी धर्मट्टी हिला यावळी 25 हजार रुपयाचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले.

सन्मानित पुरस्कारार्थीं असे

वीर जिजामाता पुरस्कार: सुमन शिवाजी सुरनर (टेनिसपटू संध्याराणी बंडगर यांच्या मातोश्री), छाया कल्याण बागडे (आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आश्लेषा बागडे यांच्या मातोश्री), वैशाली केशव गुंटूक (लांब पल्ल्याचे धावपटू साईश्वर व श्रद्धा गुंटूक यांच्या मातोश्री).

जीवन गौरव पुरस्कार: डॉ. विलास हारपाळे (कबड्डी क्रीडा संघटक).

​क्रीडा प्रशिक्षक सन्मान: कुबेर तथा के. टी. पवार (क्रिकेट), संतोष गवळी (निवृत्त शारीरिक शिक्षण संचालक), प्रकाश कंपली (क्रिकेट), मुख्याध्यापक पुंडलिक कलखांबकर (खो-खो व मैदानी खेळ).

  • Related Posts

    मी स्वतः रेशन दुकानदाराचा मुलगा’; पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे भावनिक वक्तव्य

    “मी स्वतः एका रेशन दुकानदाराचा मुलगा आहे आणि हे सांगण्यास मला कधीही लाज वाटत नाही. रेशन दुकानदारांच्या सर्व अडचणी आणि समस्या मला माहिती आहेत. येणाऱ्या काळात जिल्हा बँकेच्या माध्यमातून रेशन…

    कार्तिक पौर्णिमेनिमित्त छत्रपती शिवरायांच्या चरणी दीपोत्सव; शेकडो पणत्यांनी उजळले शिवस्मारक

    श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सोलापूर विभागाचा उपक्रम; शिवभक्तांचा उत्स्फूर्त सहभाग सोलापूर : शिवभक्तांची लगबग, शेकडो मिणमिणत्या पणत्यांचा प्रकाश आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष अशा भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात मंगळवारी कार्तिक पौर्णिमेनिमित्त…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    मी स्वतः रेशन दुकानदाराचा मुलगा’; पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे भावनिक वक्तव्य

    मी स्वतः रेशन दुकानदाराचा मुलगा’; पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे भावनिक वक्तव्य

    कार्तिक पौर्णिमेनिमित्त छत्रपती शिवरायांच्या चरणी दीपोत्सव; शेकडो पणत्यांनी उजळले शिवस्मारक

    कार्तिक पौर्णिमेनिमित्त छत्रपती शिवरायांच्या चरणी दीपोत्सव; शेकडो पणत्यांनी उजळले शिवस्मारक

    वारी विठुरायाची, काळजी आपल्या आरोग्याचा* *कार्तिकी वारीतील महाआरोग्य शिबिराचा विक्रमी प्रतिसाद

    वारी विठुरायाची, काळजी आपल्या आरोग्याचा* *कार्तिकी वारीतील महाआरोग्य शिबिराचा विक्रमी प्रतिसाद

    #मराठीतून तेलुगू लिहिण्या-वाचण्याचे धडे; १४ सत्रांच्या कार्यशाळेचा उत्साहात समारोप**

    #मराठीतून तेलुगू लिहिण्या-वाचण्याचे धडे; १४ सत्रांच्या कार्यशाळेचा उत्साहात समारोप**

    डॉ. अनुपम शहा यांना पितृशोक

    डॉ. अनुपम शहा यांना पितृशोक

    पश्चिम विभागीय पुरुष लॉन टेनिस स्पर्धेत मणिपाल विद्यापीठ, जयपूर विजेता

    पश्चिम विभागीय पुरुष लॉन टेनिस स्पर्धेत मणिपाल विद्यापीठ, जयपूर विजेता