शेती विकून विकास करू म्हणत शिंदे गट सदस्यांचा सभात्याग

सोलापूर झेडपीत पंधराव्या वित्त आयोग निधी वाटपाचा वाद

सोलापूर : सोलापूर झेडपीत पंधराव्या वित्त आयोगाच्या निधी वाटपाचा वाद विकोपाला गेला आहे. सत्ताधारी भाजपच्या सदस्यांना 90 तर विरोधी सदस्यांना 45 लाख निधी वाटपाचे धोरण अवलंबल्याने शिंदे शिवसेना गटाच्या सदस्यांनी याला शुक्रवारच्या झेडपी सर्वसाधारण सभेत आक्षेप घेतला. शिवराज मेत्रे, प्रवीण तानवडे यांनी पंधराव्या वित्त आयोगाच्या निधी वाटपाचे काय झाले असा सवाल उपस्थित केला. त्यावर उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी निधी वाटपाला मंजुरी मिळाल्या असून सोमवारी निधी वाटप होईल असे सांगितले. त्यावर या सदस्यांचे समाधान झाले नाही आम्हाला अध्यक्षांकडून उत्तर हवे आहे असा प्रतिसावाल केला. त्यावर अध्यक्ष दीपक वैद्य यांनीही सर्वांना निधी मिळेल असे सांगितले. त्यावर पुन्हा या सदस्यांनी कोणा कोणाला किती निधी व निधी वाटपाचे नियोजन कसे ठरले यावर स्पष्टीकरण मागितले. अध्यक्षांच्या उत्तरावर समाधान न झाल्याने शिंदे गटाच्या सदस्यांनी आम्ही शेती विकून मतदार संघाचा विकास करू तुमचा निधी तुमच्या जवळच ठेवा असे म्हणत सभात्याग केला.

जिल्हा परिषदेच्या सभेत सुरुवातीपासूनच अध्यक्ष दीपक वैद्य यांनी आक्रमक भूमिका घेतली. रील स्टार व सदस्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांनी सभागृहाबाहेर जाण्यास सांगितले. सीईओ कुशल जैन यांनी याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली. प्राथमिक आरोग्य केंद्र दुरुस्ती, धोकादायक शाळांच्या इमारत दुरुस्ती वरून सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. मागील सभेच्या इतिवृत्तांतून सदस्यांनी मांडलेले मुद्दे वगळल्याने यावर रणकंदन झाले. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, आरोग्य व शिक्षण सभापती चेतनसिंह केदार आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी समयसूचकता दाखवीत वेळीच सावरती भूमिका घेत सभागृहाचे वातावरण शांत केले. दुपारी दोन वाजता सुरू झालेली सभा सायंकाळी सात वाजता संपली. यात सदस्यांनी दुष्काळी परिस्थितीत पाणी व चारा टंचाईच्या मुद्द्यावर लक्षवेधी केली. आरोग्य व शिक्षण विभागाच्या प्रश्नावर आधिकार्‍यांना धारेवर धरले.

  • Related Posts

    वेंकटेश्वर देवस्थानच्या ५४ व्या ब्रह्मोत्सवाचा उत्साहात समारोप सूर्यप्रभा, चंद्रप्रभा वाहनसेवा आणि चक्रस्नानम् विधींनी भाविकांना भक्तिरसाची अनुभूती

    सोलापूर : पूर्व भागातील दाजी पेठ येथील श्री वेंकटेश्वर देवस्थानात गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या ५४ व्या ब्रह्मोत्सवाचा रविवारी (दि. २२) धार्मिक विधी आणि भक्तिमय वातावरणात उत्साहात समारोप झाला. शेवटच्या…

    संगीतकार डॉ. सलील कुलकर्णींचा संगीत प्रवास अन सुरेल गाणी ऐकत प्रिसिजन गप्पांचा थाटात समारोप

    रसिकांच्या गर्दीने हुतात्मा स्मृती मंदिर तुडुंब : सभागृहाबाहेरही प्रचंड गर्दी जयमाला शिलेदारांनी स्वतः बोलावून शिकवलेले गाणे, प्रत्यक्ष पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी कवितेवर बोलायला दिलेली संधी, स्वतःचे च गाणे गाताना सुधीर…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    वेंकटेश्वर देवस्थानच्या ५४ व्या ब्रह्मोत्सवाचा उत्साहात समारोप सूर्यप्रभा, चंद्रप्रभा वाहनसेवा आणि चक्रस्नानम् विधींनी भाविकांना भक्तिरसाची अनुभूती

    वेंकटेश्वर देवस्थानच्या ५४ व्या ब्रह्मोत्सवाचा उत्साहात समारोप सूर्यप्रभा, चंद्रप्रभा वाहनसेवा आणि चक्रस्नानम् विधींनी भाविकांना भक्तिरसाची अनुभूती

    संगीतकार डॉ. सलील कुलकर्णींचा संगीत प्रवास अन सुरेल गाणी ऐकत प्रिसिजन गप्पांचा थाटात समारोप

    संगीतकार डॉ. सलील कुलकर्णींचा संगीत प्रवास अन सुरेल गाणी ऐकत प्रिसिजन गप्पांचा थाटात समारोप

    *कडेवर मूल घेऊन आई रांगेत; शिक्षणाधिकाऱ्यांनी केलं असं काही…*

    *झेडपीत कोण कोणाचा पाहुणा नाही; प्रशासकीय कामकाजात चुका करणाऱ्या आरबळे यांच्यावर कारवाई होणारच*

    सीना- माढा सिंचन योजनेचे अभियंता पवार म्हणाले mpsc करून आलो..

    फार्मासिस्ट लीना पुजारी यांच्यावर कारवाईचे आदेश… दुष्काळी परिस्थितीवर आदिनाथ देशमुख यांनी याकडे वेधले लक्ष