*कडेवर मूल घेऊन आई रांगेत; शिक्षणाधिकाऱ्यांनी केलं असं काही…*

सोलापूर : जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांच्या कक्षासमोर लागलेल्या रांगेमध्ये कडेवर मूल घेऊन एक आई उभी होती. शिक्षण सभापतीकडील बैठक आटोपून माध्यमिक शिक्षणाधिकारी *सचिन जगताप* हे आपल्या कक्षामध्ये जात असतानाच त्यांना हे दृश्य दिसले. त्यांनी तात्काळ त्या मातेला कक्षात बोलवून कामाबाबत विचारणा केली आणि काही मिनिटातच तिचे काम हातावेगळे केले. शिक्षणाधिकारी जगताप यांच्या समयसूचकतेचे उपस्थितांमधून कौतुक होत आहे.

ही माता आपल्या बारावीच्या बोर्ड प्रमाणपत्रावरील आडनावाच्या दुरुस्तीसाठी आली होती.

*पत्रात नेमकं काय ?*

याबाबत श्री सिद्धेश्वर आर्ट्स, सायन्स व कॉमर्स ज्युनिअर कॉलेज, कुंभारी, ता. दक्षिण सोलापूर यांनी दि. १८/११/२०२६ रोजी माध्यमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर यांना पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, या शाळेतून माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २००७ मध्ये बसून उत्तीर्ण झालेली विद्यार्थिनी *कु. पल्लवी दत्तात्रय चाटला* हिच्या इ. १२ वी चे बोर्ड परीक्षेचे आवेदन पत्र भरताना नजरचुकीने आडनावाच्या स्पेलिंगमध्ये *Chatala* अशी पडलेली आहे.

परंतु कॉलेजच्या आणि शाळेच्या रेकॉर्डनुसार जनरल रजिस्टरवर सदर विद्यार्थिनीची अडनावाचे स्पेलिंग *Chatla* अशी आहे, ती बरोबर व सत्य आहे.सदर विद्यार्थिनीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर आणि गुणपत्रिकेवर अडनावाच्या स्पेलिंगमध्ये दुरुस्त होऊन मिळण्याकरिता विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रासह प्रस्ताव सादर करीत आहे. तरी सदर प्रस्ताव स्विकारून अडनावाच्या स्पेलिंगमध्ये दुरुस्ती होण्याकरीता शिफारसपत्र मिळावे आणि विहित नमुनापत्रावर प्रतिस्वाक्षरी होऊन मिळावी, अशी नम्र विनंती प्राचार्यांनी केली आहे.

या पत्राची प्रत विभागीय संचालक, पुणे शिक्षण मंडळ, पुणे आणि विभागीय सचिव, महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ, पुणे यांना देण्यात आली आहे. शिक्षणाधिकारी जगताप यांनी या प्रकरणात तात्काळ लक्ष घालून शिफारस व प्रतिस्वाक्षरीची प्रक्रिया मार्गी लावल्याने त्या मातेला दिलासा मिळाला.

  • Related Posts

    वेंकटेश्वर देवस्थानच्या ५४ व्या ब्रह्मोत्सवाचा उत्साहात समारोप सूर्यप्रभा, चंद्रप्रभा वाहनसेवा आणि चक्रस्नानम् विधींनी भाविकांना भक्तिरसाची अनुभूती

    सोलापूर : पूर्व भागातील दाजी पेठ येथील श्री वेंकटेश्वर देवस्थानात गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या ५४ व्या ब्रह्मोत्सवाचा रविवारी (दि. २२) धार्मिक विधी आणि भक्तिमय वातावरणात उत्साहात समारोप झाला. शेवटच्या…

    संगीतकार डॉ. सलील कुलकर्णींचा संगीत प्रवास अन सुरेल गाणी ऐकत प्रिसिजन गप्पांचा थाटात समारोप

    रसिकांच्या गर्दीने हुतात्मा स्मृती मंदिर तुडुंब : सभागृहाबाहेरही प्रचंड गर्दी जयमाला शिलेदारांनी स्वतः बोलावून शिकवलेले गाणे, प्रत्यक्ष पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी कवितेवर बोलायला दिलेली संधी, स्वतःचे च गाणे गाताना सुधीर…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    वेंकटेश्वर देवस्थानच्या ५४ व्या ब्रह्मोत्सवाचा उत्साहात समारोप सूर्यप्रभा, चंद्रप्रभा वाहनसेवा आणि चक्रस्नानम् विधींनी भाविकांना भक्तिरसाची अनुभूती

    वेंकटेश्वर देवस्थानच्या ५४ व्या ब्रह्मोत्सवाचा उत्साहात समारोप सूर्यप्रभा, चंद्रप्रभा वाहनसेवा आणि चक्रस्नानम् विधींनी भाविकांना भक्तिरसाची अनुभूती

    संगीतकार डॉ. सलील कुलकर्णींचा संगीत प्रवास अन सुरेल गाणी ऐकत प्रिसिजन गप्पांचा थाटात समारोप

    संगीतकार डॉ. सलील कुलकर्णींचा संगीत प्रवास अन सुरेल गाणी ऐकत प्रिसिजन गप्पांचा थाटात समारोप

    *कडेवर मूल घेऊन आई रांगेत; शिक्षणाधिकाऱ्यांनी केलं असं काही…*

    *झेडपीत कोण कोणाचा पाहुणा नाही; प्रशासकीय कामकाजात चुका करणाऱ्या आरबळे यांच्यावर कारवाई होणारच*

    सीना- माढा सिंचन योजनेचे अभियंता पवार म्हणाले mpsc करून आलो..

    फार्मासिस्ट लीना पुजारी यांच्यावर कारवाईचे आदेश… दुष्काळी परिस्थितीवर आदिनाथ देशमुख यांनी याकडे वेधले लक्ष