विष्णू कारमपुरी (महाराज) यांच्या हस्ते महाआरती; कामगार बंधू-भगिनींना फराळ व तीर्थप्रसादाचे वाटप
सोलापूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र कामगार सेना कार्यालयात मंगळवार, दि. १० नोव्हेंबर रोजी दिवाळी पाडव्यानिमित्त महालक्ष्मी पूजन व महाआरती धार्मिक वातावरणात उत्साहात पार पडली.
सकाळी ९.३० वाजता श्री महालक्ष्मीचे विधिवत पूजन करून महाआरती करण्यात आली. त्यानंतर कामगार बंधू-भगिनी आणि बालगोपाळांनी फटाक्यांची आतषबाजी करीत दिवाळी पाडव्याचा आनंद साजरा केला. महापूजेनंतर उपस्थितांना दिवाळी फराळ व तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारमपुरी (महाराज) यांनी उपस्थित सर्व कामगार बंधू-भगिनींना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी नागनाथ कारमपुरी, विक्रम कारमपुरी, शुभम कारमपुरी, आप्पा चिलवेरी, विठ्ठल कुऱ्हाडकर, श्रीनिवास बोगा, गुरुनाथ कोळी, डॉ. मुनीनाथ कारमपुरी, बालाजी मेंतकू, पवित्रा कारमपुरी, महानंदा कैरमकोंडा, रेखा आडकी, लक्ष्मीबाई कोनपुरे, सुदीप कैरमकोंडा, अक्षय नंदाल, विजय निली, प्रसाद जगताप, किरण गायकवाड, प्रीती आडकी, शिवा सारंगी, शुभम चिलवेरी, बाबुराव गडगी, लक्ष्मीकांत कोडम, श्रीधर आडकी, प्रेम आडकी, पप्पू शेख, नवीन कारमपुरी, विनीता कारमपुरी आणि मनश्री कारमपुरी यांच्यासह कामगार सेनेचे पदाधिकारी व कामगार बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळ : महाराष्ट्र कामगार सेना कार्यालयात दिवाळी पाडव्यानिमित्त महालक्ष्मी पूजन व महाआरतीप्रसंगी विष्णू कारमपुरी (महाराज), ॲड. मुनीनाथ कारमपुरी, विठ्ठल कुऱ्हाडकर, गुरुनाथ कोळी व महिला पदाधिकारी.
