मोहिते-पाटलांनी माळशिरसचा गड राखला; अर्जुनसिंह मोहिते-पाटील विजयी. बँकिंग व पतसंस्था मतदारसंघात मनीष देशमुख यांची अवघ्या २८ मतांनी बाजी.
#सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजप प्रणित सहकार विकास पॅनलने मोठे यश मिळवले आहे. एकूण १९ जागांपैकी १८ जागांवर या पॅनलने विजय मिळवत बँकेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. दुसरीकडे, मोहिते-पाटील यांच्या स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलने माळशिरसचा गड राखला. माळशिरस विकास सोसायटी मतदारसंघातून अर्जुनसिंह मोहिते-पाटील विजयी झाले.
या निवडणुकीत भाजप प्रणित सहकार विकास पॅनलसमोर मोहिते-पाटील यांच्या स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलचे आव्हान होते. सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या बँकिंग व पतसंस्था मतदारसंघात मनीष देशमुख यांनी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांचा अवघ्या २८ मतांनी पराभव केला. या चुरशीच्या लढतीची जिल्हाभर चर्चा रंगली होती.
#भाजप प्रणित सहकार विकास पॅनलचे बिनविरोध विजयी उमेदवार
* राजेंद्र राऊत – बार्शी विकास सोसायटी
* प्रशांत परिचारक – पंढरपूर विकास सोसायटी
* विक्रांत (बाळराजे) पाटील – मोहोळ विकास सोसायटी
* सिद्धेश्वर आवताडे – मंगळवेढा विकास सोसायटी
* यशराज शिंदे – माढा विकास सोसायटी
* श्रीदीप हसापुरे – दक्षिण सोलापूर विकास सोसायटी
* पृथ्वीराज माने – उत्तर सोलापूर विकास सोसायटी
* शंभूराजे जगताप – करमाळा विकास सोसायटी
* सचिन कल्याणशेट्टी – अक्कलकोट विकास सोसायटी
* अजिंक्यराणा पाटील – ओबीसी मतदारसंघ
#भाजप प्रणित सहकार विकास पॅनलचे विजयी उमेदवार
* बाबासाहेब देशमुख – सांगोला विकास सोसायटी
* अर्चना घाडगे – महिला मतदारसंघ
* शामल बागल – महिला मतदारसंघ
* राजेंद्र बंदीछोडे – इतर भटक्या जमाती
* रणजितसिंह शिंदे – कृषी व प्रक्रिया
* मनीष देशमुख – बँक व पतसंस्था
* सूर्यादित्य साळुंखे – दुग्ध विकास
* महादेव कांबळे – अनुसूचित जाती
स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलचा विजयी उमेदवार
1. #अर्जुनसिंह मोहिते-पाटील – माळशिरस विकास सोसायटी
अशा प्रकारे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजप प्रणित सहकार विकास पॅनलने १८ जागा मिळवत मोठे यश संपादन केले, तर मोहिते-पाटील यांनी माळशिरस मतदारसंघात आपले प्रतिनिधित्व कायम राखले.






