#सोलापूर_जिल्हा_परिषद – #स्थायी_समिती_सभा

मागील स्थायी समिती सभेचे कार्यवृत्त कायम करणे.

शासनाकडून प्राप्त महत्त्वपूर्ण परिपत्रके व शासन निर्णयांची नोंद घेणे.

विविध विभागांतील विकासकामांचा आढावा घेणे.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या जमा-खर्चास मंजुरीबाबत विचारविनिमय करणे.

जिल्हा ग्रामीण विकास निधीच्या माहितीचे अवलोकन करून आवश्यक मंजुरी देणे.

विविध विषय समित्यांच्या मे २०२६ मधील सभांच्या कार्यवृत्तांची नोंद घेणे.

आगामी आषाढी वारी २०२६ सुरळीत, सुरक्षित व यशस्वीपणे पार पडावी यासाठी आवश्यक नियोजन, सुविधा व समन्वयाबाबत चर्चा करणे.

यावेळी दिपक वैद्य -अध्यक्ष, जिल्हा परिषद सोलापूर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम समितीचे सभापती इंद्रजीत पवार , चेतनसिंह केदार-सावंत-सभापती, शिक्षण व आरोग्य समिती, मा. रामप्पा चिवडशेट्टी -सभापती, कृषी व पशुसंवर्धन समिती, अमृता वाघे-सभापती, महिला व बालकल्याण समिती, संस्कृती सातपुते-सभापती, समाजकल्याण समिती, शांभवी कल्याणशेट्टी जिल्हा परिषद सदस्या, बालाजी नरोटे जिल्हा परिषद सदस्य, रमेश भांजे जिल्हा परिषद सदस्य, स्मिता पाटील- प्रशासकीय अधिकारी, मिनाक्षी वाकडे -वित्त व लेखाधिकारी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी, जनहिताच्या कामांना गती देण्यासाठी आणि वारकरी बांधवांच्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *