समाधान समारोह,2026 सर्वोच्च न्यायालयातील विशेष लोक अदालत…

सोलापूर दि.03 (जिमाका):- “न्यायप्रक्रियेत सहभाग” आणि “न्याय आपल्या दारी” या संकल्पनेला मुर्त रूप देण्यासाठी मा. सर्वोच्च न्यायालयाने “समाधान समारोह” या उपक्रमाचे आयोजन केले आहे. या उपक्रमाचा दिनांक 21 एप्रिल, 2026 पासून प्रारंभ झालेला असून दिनांक 21, 22 आणि 23 ऑगस्ट 2026 रोजी विशेष लोक अदालतीमध्ये समारोप होणार आहे.
या लोकअदालतीमध्ये सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे तडजोडीसाठी ठेवली जाणार आहेत. जिल्हयातील ज्या पक्षकारांची प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्यास व ती तडजोडीने मिटावीत, अशी ज्यांची इच्छा असेल ती प्रकरणे विशेष लोकअदालतीमध्ये ठेवता येउ शकतात. उपरोक्त लोकअदालतीमध्ये पक्षकार प्रत्यक्ष किंवा आभासी पध्दतीने सहभागी होउ शकतात. जिल्हयातील प्रकरणे सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष लोकअदालतीमध्ये ठेवण्यासाठी संबंधित विधीज्ञांना कल्पना द्यावी किंवा अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर किंवा तालुका विधी सेवा समिती यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. सुनिल शिंदे यांनी केले आहे.
लोकअदालतीचा फायदा- साध्या व सोप्या पध्दतीने वाद मिटवता येतो झालेल्या तडजोडीच्या निवाडा अंतिम व अंमलबजावणी होउ शकणार असतो. वेळेची व पैशाची बचत होते. तडजोड झाल्यास न्यायालयीन शुल्क परत मिळते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *