अक्कलकोटमध्ये ट्रक पार्किंगला भीषण आग! ५ ते ६ ट्रक जळून खाक; परिसरात खळबळ
सोलापूर-अक्कलकोट महामार्गावरील खासगी पार्किंगमधील घटना; अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न
अक्कलकोट : सोलापूर-अक्कलकोट महामार्गावरील एका खासगी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या ट्रकना आज भीषण आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली. या आगीत आतापर्यंत जवळपास ५ ते ६ ट्रक जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या ट्रकना अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. आगीचे नेमके कारण आणि नुकसानीचा तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाही.
या घटनेबाबत अधिक माहिती मिळताच अपडेट देण्यात येईल.

