जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजप सदस्यांचे सुद्धा अधिकारी ऐकत नसल्याचे चित्र पाहायला मिळाले. बोरामणी जिल्हा परिषद गटाचे सदस्य नेताजी खंडागळे हे महावितरणच्या अधिकाऱ्यावर चांगलेच वैतागल्याचे दिसून आले.
प्रत्येक सर्वसाधारण सभेत मी एकच विषय मांडतो, माझा दुसरा विषय नाही. माझ्या मतदारसंघात लाईटचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. लाईट वेळेवर नसल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण होते. माझा मतदारसंघ शहराला लागून असल्याने भाजीपाला पिकवणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत जर लाईटच नाही मिळाली तर शेतकऱ्यांचे हाल होतात. वारंवार लाईट जाते. डीपी बंद पडतो, तुमची कामे आम्हीच करायची का? तुमच्या डिपार्टमेंटने मला पगार दिला पाहिजे. जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आठ तास वीज देण्याच्या आश्वासन दिले परंतु त्याचे पालन महावितरण अधिकारी करत नाहीत.
“मी इंजिनिअर आहे, वकील आहे, मला सर्व माहिती आहे. सब स्टेशन बंद पडल्यावर तुम्हाला त्याची जाणीव होणार आहे का? आम्ही बेकायदेशीर कामे करायची का? त्यामुळे आम्हाला सलग आठ तास वीज द्या अशी मागणी त्यांनी लावून धरली.






