‘विठ्ठल पावणार!’ ९६९ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कायम सेवेचा प्रश्न मार्गी लागणार?

एकनाथ शिंदेंचे तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश; श्रीकांत शिंदेंकडून मुंबईत बैठकीचे आश्वासन..

पंढरपूर /प्रतिनिधी

गेल्या अनेक वर्षांपासून कंत्राटी तत्त्वावर सेवा बजावूनही कायमस्वरूपी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातील ९६९ कर्मचाऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कायम करण्याच्या मागणीची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली असून, संबंधित विभागाला तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेला आता पूर्णविराम मिळणार का, याकडे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र राज्य पाणी व स्वच्छता शासकीय कंत्राटी कर्मचारी कृती समितीच्या शिष्टमंडळाने पंढरपूर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील शासकीय महापूजेसाठी उपमुख्यमंत्री शिंदे पंढरपुरात आले असता शासकीय विश्रामगृहात ही भेट झाली. यावेळी कृती समितीचे अध्यक्ष रमाकांत गायकवाड, कार्याध्यक्ष सचिन जाधव, जलजीवन मिशनचे शंकर बंडगर आणि वॉश पीएमयूचे आनंद मोची यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे त्यांचे लक्ष वेधले.

राज्यात जलजीवन मिशनअंतर्गत जिल्हा व तालुका स्तरावर गेल्या १४ वर्षांपासून कर्मचारी कार्यरत आहेत. तसेच स्वच्छ भारत मिशनअंतर्गत २०५ कर्मचारी सेवा बजावत आहेत. पाणी व स्वच्छता क्षेत्रात गेल्या २२ वर्षांपासून विविध कर्मचारी काम करीत असून, एकूण ९६९ कर्मचाऱ्यांची दहा वर्षांपेक्षा अधिक सेवा झाली आहे. इतकी प्रदीर्घ सेवा देऊनही त्यांना अद्याप कायमस्वरूपी सेवेचा लाभ मिळालेला नसल्याची व्यथा कृती समितीने मांडली.

राज्यातील अन्य विभागांतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्याच्या निर्णयांचा दाखला देत पाणी व स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांनाही न्याय देण्याची मागणी करण्यात आली. अपंग समावेशित शिक्षण उपक्रमातील साडेतीन हजार, सर्व शिक्षा अभियानातील साडेतीन हजार आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानातील सुमारे १४ हजार कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेतल्याचा संदर्भ देत, त्याच धर्तीवर ९६९ कर्मचाऱ्यांचाही सकारात्मक विचार करावा, अशी मागणी कार्याध्यक्ष सचिन जाधव यांनी केली.

या मागण्यांची दखल घेत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाला तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, आमदार राजाभाऊ खरे, आमदार अभिजित पाटील, आमदार उत्तम जानकर आणि पंढरपूरच्या नगराध्यक्षा प्रणिता भालके उपस्थित होत्या. कृती समितीचे उपाध्यक्ष ऋषिकेश शिलवंत, बंडू हिवरे, अजय राऊत, दिलीप मस्के आणि नागपूरचे निखिल रौंदाळकर यांनीही यासाठी सहकार्य केले.

खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशीही सकारात्मक चर्चा

दरम्यान, कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांचीही भेट घेऊन ९६९ कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न मांडला. केंद्र सरकारच्या बदलत्या धोरणांचा विचार करून या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कायम करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली. यावर खासदार शिंदे यांनी सकारात्मक भूमिका दर्शविली असून, पुढील आठवड्यात मुंबई येथे यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले.

उपमुख्यमंत्र्यांकडून तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश आणि खासदारांकडून मुंबईत बैठकीचे आश्वासन मिळाल्याने ९६९ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कायम सेवेच्या आशा उंचावल्या आहेत. आता मुंबईतील बैठकीत काय निर्णय होतो आणि या कर्मचाऱ्यांना प्रत्यक्षात कायम सेवेचा लाभ कधी मिळतो, याकडे राज्यातील कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Zilla Parishad Solapur

Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे

  • Related Posts

    रोहित पवार काँग्रेसमध्ये प्रवेश करणार..!

    कर्नाटक मुख्यमंत्री आणि काही काँग्रेसचे वरिष्ठ नेते यांच्यासोबत रोहित पवार यांची मिटिंग झाली असल्याची चर्चा : उमेश पाटील,राष्ट्रवादी नेते

    #अवघ्या २३ व्या वर्षी भारतीय तरुणाची जागतिक भरारी! ४२ हजार कोटींच्या कंपनीचा मालक; Palo Alto Networks कडून ४.५ अब्ज डॉलरचा व्यवहार

    #स्टॅनफोर्ड विद्यापीठातून शिक्षण सोडले, OpenAI मध्ये केले काम; स्वतःची एआय कंपनी उभारून अवघ्या दीड वर्षात जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात निर्माण केला दबदबा सोलापूर : प्रतिनिधी ४.५ अब्ज डॉलरचा ऐतिहासिक व्यवहार #Palo…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    रोहित पवार काँग्रेसमध्ये प्रवेश करणार..!

    रोहित पवार काँग्रेसमध्ये प्रवेश करणार..!

    ‘विठ्ठल पावणार!’ ९६९ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कायम सेवेचा प्रश्न मार्गी लागणार?

    ‘विठ्ठल पावणार!’ ९६९ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कायम सेवेचा प्रश्न मार्गी लागणार?

    #अवघ्या २३ व्या वर्षी भारतीय तरुणाची जागतिक भरारी! ४२ हजार कोटींच्या कंपनीचा मालक; Palo Alto Networks कडून ४.५ अब्ज डॉलरचा व्यवहार

    #अवघ्या २३ व्या वर्षी भारतीय तरुणाची जागतिक भरारी! ४२ हजार कोटींच्या कंपनीचा मालक; Palo Alto Networks कडून ४.५ अब्ज डॉलरचा व्यवहार

    #किसान नगर येथे आमदार देवेंद्र कोठे यांच्या विकासनिधीतून रस्ते कामाचा शुभारंभ

    #किसान नगर येथे आमदार देवेंद्र कोठे यांच्या विकासनिधीतून रस्ते कामाचा शुभारंभ

    #धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते, भाजपचे राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचे निधन

    #धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते, भाजपचे राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचे निधन

    ब्रेकिंग : मार्केट यार्ड चौकात कंटेनर पलटी; चालक आणि क्लिनर जखमी!

    ब्रेकिंग : मार्केट यार्ड चौकात कंटेनर पलटी; चालक आणि क्लिनर जखमी!