‘#आमदार आपल्या भेटीला’ उपक्रमाद्वारे नागरिकांशी साधला संवाद
सोलापूर : प्रतिनिधी
शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ११ मध्ये किसान नगर येथे आमदार देवेंद्र कोठे यांच्या विकास निधीतून होणाऱ्या रस्ते कामाचा शुभारंभ आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते करण्यात आला.
किसान नगर येथील श्री करी विरभद्रेश्वर देवस्थान जवळ हा कार्यक्रम झाला. श्री स्वामी बोळ ते श्री करी विरभद्रेश्वर देवस्थान या रस्त्याच्या कामासाठी आमदार देवेंद्र कोठे यांनी १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर वेदमूर्ती बसय्या स्वामी, नगरसेवक युवराज सरवदे, नगरसेवक अजय पोन्नम, नगरसेविका शारदा रामपुरे, नगरसेविका मीनाक्षी कडगंची, नगरसेवक तथा मंडल अध्यक्ष अक्षय अंजिखाने, माजी नगरसेवक राजकुमार हंचाटे, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगांवकर, दत्तात्रय कडगंची, रामदास मगर आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार देवेंद्र कोठे म्हणाले,
अक्कलकोट रस्ता, मल्लिकार्जुन नगर, किसान नगर यांसह परिसरातील अनेक नगरांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून विकासकामांची नागरिकांना प्रतीक्षा होती. आमदारपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून या भागाच्या विकासाला प्राधान्य देत भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. या परिसरातील समस्या सोडवण्यासाठी टप्प्याटप्प्याने प्रयत्न सुरू आहेत. महानगरपालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या १ हजार ४०० कोटी रुपयांच्या महत्त्वकांक्षी पाणीपुरवठा योजनेतून या परिसरातील शेवटच्या घरापर्यंत नळाद्वारे पाणी पोहोचवण्याचा आमचा संकल्प आहे. शहरातील इतर विकसित भागांप्रमाणेच या परिसरातील नागरिकांनाही दर्जेदार रस्ते, नियमित पाणीपुरवठा आणि सर्व आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचेही आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगितले.
#यावेळी “आमदार आपल्या भेटी”ला उपक्रमांतर्गत आमदार देवेंद्र कोठे यांनी किसान नगर, गंगाधर नगर तसेच परिसरातील विविध नगरांना भेटी देऊन परिसरातील नागरिकांची संवाद साधला आणि स्थानिक प्रश्नांची माहिती घेत हे प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन दिले.
यावेळी वेदमूर्ती बसय्या स्वामी, नगरसेवक युवराज सरवदे, नगरसेवक अजय पोन्नम, नगरसेविका शारदा रामपुरे, नगरसेविका मीनाक्षी कडगंची, नगरसेवक तथा मंडल अध्यक्ष अक्षय अंजिखाने, माजी नगरसेवक राजकुमार हंचाटे, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगांवकर, दत्तात्रय कडगंची, रामदास मगर, संगीता खंदारे, संगप्पा बबलाद, प्रभाकर गम्पले, संजय पाटील, सिद्धाराम प्याटी, बलभीम देवकर, ओम निंबर्गी, रामकृष्ण पोन्नम, राजशेखर गुंड, नागेश वच्छे, सिद्धू हुलबुट्टे, दिपाली शिवगुंडे, राजू बिराजदार, कोरे यांच्यासह परिसरातील नागरिक, माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
———
#समस्या निराकरणाच्या पुढाकाराचे नागरिकांकडून कौतुक
आमदार देवेंद्र कोठे यांनी ‘आमदार आपले भेटीला’ उपक्रमांतर्गत ‘प्रभाग चलो’ अभियानात किसान नगर परिसरातील भ्रमरांबिका मंदिर परिसर, गंगाधर नगर परिसरातील नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. मागील भेटीवेळी नागरिकांनी सांगितलेल्या बहुतांश समस्यांवर विकासकामरूपी उत्तर शोधून नागरिकांचे समाधान केल्याने आमदार देवेंद्र कोठे यांच्या समस्या निराकरणाच्या या पुढाकाराचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले.
———-
#बूथप्रमुखांच्या घरी भेट देऊन वाढविले मनोबल
आमदार देवेंद्र कोठे यांनी शहर मध्य मतदारसंघात संघटनात्मक कार्य विस्तारासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून किसान नगर परिसरातील बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख यांच्या निवासस्थानी भेट देऊन, त्यांची विचारपूस करून भाजपच्या या कार्यकर्त्यांचे मनोबल आमदार देवेंद्र कोठे यांनी वाढविले.








