सोलापूर : प्रतिनिधी
सोलापुरातील सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात रविवारी (दि. २२ नोव्हेंबर) सायंकाळी तुलसी विवाह सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला. या सोहळ्यानिमित्त मंदिर परिसरात धार्मिक आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी पारंपरिक धार्मिक विधी पार पाडण्यात आले. तसेच मंगलाष्टकांच्या मंगलमय स्वरांनी विवाह सोहळ्याला विशेष रंगत आली. या धार्मिक सोहळ्यात अनेक स्त्री-पुरुष भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. श्रद्धा आणि भक्तिभावाने भाविकांनी तुलसी विवाह सोहळ्याचा आनंद घेतला.







