सोलापूर : प्रतिनिधी
विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने अखेर माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
भाजपच्या शहराध्यक्षा, जिल्हाध्यक्ष ग्रामीण यांच्यापासून इतर काही माजी आमदार मंडळी या निवडणुकीच्या उमेदवारीत चर्चेमध्ये होती.
भाजपच्या उमेदवारीसाठी माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे नाव आघाडीवर मानले जात होते. मात्र पक्षश्रेष्ठींनी अखेर राजेंद्र राऊत यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने परिचारक समर्थकांमध्ये काहीशी नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Post Views: 8