महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान दक्षिण सोलापूर मतदारसंघातील भीमा नदीकाठच्या गावांमध्ये शेतीसाठी निर्माण झालेल्या वीजटंचाईच्या गंभीर प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधले.
भीमा नदीलगतचा परिसर कर्नाटक राज्याच्या सीमेलगत असल्याने तेथील शेतकऱ्यांना दररोज ८ ते १० तास वीजपुरवठा उपलब्ध होत असताना, दक्षिण सोलापूर मतदारसंघातील भीमा नदीकाठच्या गावांमध्ये केवळ २ तास वीजपुरवठा होत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिली. अपुऱ्या वीजपुरवठ्यामुळे सिंचन व्यवस्था प्रभावित होत असून शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याकडेही लक्ष वेधले.
दक्षिण सोलापूर मतदारसंघातील भीमा नदीलगतच्या गावांना कर्नाटकच्या धर्तीवर किमान ८ ते १० तास नियमित वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी यावेळी केली.
यावर तालीका अध्यक्ष श्री. समाधान आवताडे यांनी सकारात्मक भूमिका घेत, “यासंदर्भात मा. मुख्यमंत्री यांना पत्र दिले असून ऊर्जा विभागालाही त्यानुसार आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत,” अशी माहिती सभागृहात दिली.
शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि शेतीच्या शाश्वत विकासासाठी या प्रश्नाचा पाठपुरावा यापुढेही सातत्याने सुरू राहील.
https://www.facebook.com/share/p/1CCLZQj79T/