रेल्वेची जागा नगरपालिकेकडे; संत नामदेव महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित स्मारक उभारण्यात येणार
पंढरपूर : विठ्ठलनगरी पंढरपूर येथे संत शिरोमणी नामदेव महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याच्या प्रकल्पाला महाराष्ट्र राज्याच्या उच्चाधिकार समितीने मान्यता दिली आहे. सुमारे 94 कोटी रुपये खर्चाच्या या महत्त्वपूर्ण प्रकल्पामुळे पंढरपूरच्या धार्मिक आणि ऐतिहासिक वैभवात भर पडणार आहे. याबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माहिती दिली





