पावसाळी कामांचा घेणार आढावा; नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ कारवाईचे संकेत
शहरात झालेल्या पहिल्याच दमदार पावसानंतर अनेक भागांमध्ये पाणी साचल्याच्या आणि पावसाळी कामांतील त्रुटी समोर आल्याच्या पार्श्वभूमीवर महापौर विनायक कोंड्याल ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. आज सोमवारी 29 जून रोजी शहरातील पाणी तुंबलेल्या परिसरांसह विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी करून पावसाळी कामांचा आढावा घेणार असून, संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देणार आहेत.
