‘हर्र बोला हर्र…’च्या जयघोषात निघाली ६८ लिंग पदयात्रा; ९ तासांत १८ किलोमीटरचा पायी प्रवास

महिला-मुलींच्या संरक्षणासह पावसासाठी सिद्धेश्वर चरणी साकडे; ५१व्या वर्षी भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग

सोलापूर | प्रतिनिधी

‘हर्र बोला हर्र…’च्या जयघोषाने सोलापूरचा परिसर दुमदुमला. तिसऱ्या श्रावणी रविवारचे औचित्य साधून ६८ लिंग भक्त मंडळ आणि वीरशैव व्हिजन यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांनी पंचक्रोशीत स्थापन केलेल्या ६८ लिंगांची पदयात्रा उत्साहात काढण्यात आली. यंदा या पदयात्रेचे ५१वे वर्ष होते.

सकाळी ७ वाजता ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांची आरती व पूजन करून पदयात्रेला सुरुवात झाली. तब्बल ९ तास आणि १८ किलोमीटरचा पायी प्रवास करत भक्तगणांनी महिला व मुलींच्या संरक्षणासाठी तसेच राज्यात समाधानकारक पाऊस पडावा, यासाठी सिद्धेश्वर चरणी साकडे घातले.

बसवराज सावळगी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ६८ लिंग भक्त मंडळाचे अध्यक्ष शिवानंद सावळगी यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा पार पडली. वीरशैव व्हिजनचे संस्थापक सहसचिव संजय साखरे, उत्सव समिती अध्यक्ष विजयकुमार बिराजदार यांच्यासह राजेश नीला, अरुण पाटील, मन्मथ कपाळे, गंगाधर झुरळे, शांतवीर बसवंती, शेखर गुजले, महादेव कलशेट्टी, प्रशांत गंचिनगोटे, किरण अजिंखाने, सुब्रमणी लोणारे, विश्वनाथ राठोड, परमेश्वर शहापुरे (पुणे), प्रतिक हारके, सिद्धाराम वच्चे, शिवशंकर जंगम आदींसह महिला व पुरुष भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले.

पदयात्रेदरम्यान भक्तांनी ‘हर्र बोला हर्र…’चा जयघोष करत धार्मिक वातावरण निर्माण केले. मीठ गल्ली येथील शिवानुभव मंगल कार्यालयात आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी यांच्यातर्फे पदयात्रेकरूंसाठी फराळ व चहापानाची व्यवस्था करण्यात आली. दुपारी ३ वाजता श्री मल्लिकार्जुन मंदिर येथे आरती व पूजन करून पदयात्रेचा समारोप करण्यात आला. यावेळी वीरशैव व्हिजनतर्फे भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.

पदयात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी महेश माळगे-स्वामी, बसवराज बेऊर, धानेश सावळगी, मल्लिनाथ सोड्डे, महेश गुड्डद, दीपक पटणे आणि महादेव कलशेट्टी यांनी परिश्रम घेतले.

पहिल्यांदाच केली ६८ लिंग पदयात्रा

माहेश्वरी वाघमारे, राधिका अंगेरी, श्रुती गंगेरी, द्राक्षायणी अतने, हणमंत अतने, मीनाक्षी बशेट्टी, वंदना मस्कले, प्रतिभा चौगुले, रेश्मा पवार, वैष्णवी जावळे या सिद्धेश्वर भक्तांनी यंदा पहिल्यांदाच ६८ लिंग पदयात्रेत सहभाग घेतला.

Screenshot

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *