सोलापूरकर, पुढचे काही दिवस 12157 हुतात्मा एक्स्प्रेसचा, संध्याकाळ चा पुणे – सोलापूर प्रवास टाळा डिस्क्लेमर : जनहितार्थ प्रकाशित. या वृत्तातील मजकूर, मते व दावे संबंधित स्रोतांकडून प्राप्त माहितीनुसार असून त्यास “पनाह न्यूज” चे समर्थन असेलच असे नाही.

सोलापूरकर,

*पुढचे काही दिवस 12157 हुतात्मा एक्स्प्रेसचा,*

*संध्याकाळ चा पुणे – सोलापूर प्रवास टाळा*

हुतात्मा एक्सप्रेस 12158 जी सोलापूरहुन पुण्याला पोहोचताच पुणे – अमरावती व त्यानंतर अमरावती – अजनी (नागपूर) अशी पळवली जाते,

*दौंड – मनमाड ट्रॅक डबलिंगच्या कामामुळे,* सध्या दौंड कॉर्डलाईन – अहमदनगर- मनमाड मार्गे न जाता कुर्डुवाडी – लातूर मार्गे जात आहे त्यामुळे अंतर वाढून प्रवासाचा वेळही जास्त लागत आहे ज्याचा परिणाम ही गाडी पुण्याला वेळेवर न पोहोचल्यामध्ये दिसत आहे !!

*परिणामतः जी गाडी सोलापूरसाठी सायंकाळी 17.55 ला निघणे अपेक्षित असते ती वेळेवर न पोहोचल्याने रात्री अकराच्या आधी निघू शकत नाही* त्यामुळे *प्रवाश्यांनी हे ट्रॅक डब्लिंगचे काम होईपर्यंत* आपापल्या जबाबदारीवरच सायंकाळच्या हुतात्मा एक्सप्रेसमध्ये प्रवास करावा अन्यथा *मुंबईवरून सोलापूरकडे येणाऱ्या पर्यायी रेल्वेगाड्यांचा वापर करावा* !! डिस्क्लेमर : जनहितार्थ प्रकाशित. या वृत्तातील मजकूर, मते व दावे संबंधित स्रोतांकडून प्राप्त माहितीनुसार असून त्यास “पनाह न्यूज” चे समर्थन असेलच असे नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *