मत्स्यव्यवसाय विभागाच्या 23 योजनांसाठी महाडीबीटी 2.0 प्रणालीवर अर्ज प्रक्रिया सुरू

सोलापूर जिल्ह्यातील मत्स्यव्यावसायिकांना ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन – सहायक आयुक्त ज.म.शेख

सोलापूर : मत्स्यव्यावसायिकांचे जीवनमान उंचावणे, आर्थिक समृद्धी साधणे, रोजगार व उद्योजकतेला चालना देणे तसेच मत्स्यव्यवसायातून शाश्वत उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शासनामार्फत मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाच्या 23 योजनांसाठी महाडीबीटी 2.0 प्रणालीवर ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील पात्र मत्स्यव्यावसायिकांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक), सोलापूर यांनी केले आहे.

मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते दि. 28 ऑक्टोबर 2026 रोजी महाडीबीटी 2.0 प्रणालीवर अर्ज स्वीकारण्याच्या प्रक्रियेचा शुभारंभ करण्यात आला. या योजनांमध्ये भूजलाशयीन मत्स्यव्यवसायासाठीच्या राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनांचा समावेश आहे. या माध्यमातून पात्र मत्स्यव्यावसायिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेता येणार आहे.

योजनेंतर्गत उपलब्ध शासकीय डेटाबेसच्या आधारे लाभार्थ्यांच्या माहितीची पडताळणी करण्यात येणार आहे. मंजूर होणारे अनुदान लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात ऑनलाइन जमा करण्यात येणार असून, संबंधित सेवांची प्रमाणपत्रेही ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

ऑनलाइन अर्जासाठी महाडीबीटी 2.0 संकेतस्थळाचा वापर करा

सोलापूर जिल्ह्यातील सर्व मत्स्यकास्तकार, मच्छीमार, मत्स्यव्यावसायिक तसेच मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांचे पदाधिकारी व सभासद यांनी https://mahadbt2.maharashtra.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर आधार क्रमांकाच्या आधारे महाआयडी तयार करून संबंधित योजनांसाठी ऑनलाइन अर्ज करावेत.

अर्ज करताना किंवा महाआयडी तयार करताना काही अडचणी उद्भवल्यास सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक), सोलापूर यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. या कार्यालयात मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना कक्ष स्थापन करण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत 9423758824/ 9970562920 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.

संपर्कासाठी कार्यालयाचा पत्ता :

सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक), सोलापूर यांचे कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, सोलापूर – 413003. संपर्क अधिकारी : श्री. भि. श. पाटील, मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, सोलापूर.

ई-मेल : acfsolapur@gmail.com

जिल्ह्यातील पात्र मत्स्यव्यावसायिकांनी महाडीबीटी 2.0 प्रणालीवर ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक), सोलापूर ज. मो. शेख यांनी प्रसिध्दी कळविले आहे.

  • Related Posts

    महात्मा बसवेश्वर शासकीय आयटीआयचा पदवीदान समारंभ २१ नोव्हेंबरला

    सोलापूर : महात्मा बसवेश्वर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), सोलापूर येथे उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांचा पदवीदान समारंभ शनिवार, २१ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता संस्थेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. या…

    सोलापूर DCC बँकेच्या निवडणुकीसाठी चिन्ह वाटप झाले

    भाजपच्या पॅनलला ‘कपबशी’, मोहिते-पाटील पॅनलला ‘शिट्टी’!

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    मत्स्यव्यवसाय विभागाच्या 23 योजनांसाठी महाडीबीटी 2.0 प्रणालीवर अर्ज प्रक्रिया सुरू

    मत्स्यव्यवसाय विभागाच्या 23 योजनांसाठी महाडीबीटी 2.0 प्रणालीवर अर्ज प्रक्रिया सुरू

    महात्मा बसवेश्वर शासकीय आयटीआयचा पदवीदान समारंभ २१ नोव्हेंबरला

    महात्मा बसवेश्वर शासकीय आयटीआयचा पदवीदान समारंभ २१ नोव्हेंबरला

    सोलापूर DCC बँकेच्या निवडणुकीसाठी चिन्ह वाटप झाले

    सोलापूर DCC बँकेच्या निवडणुकीसाठी चिन्ह वाटप झाले

    डीसीसी बँकेच्या निवडणुकी संदर्भात पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे महत्त्वाचे वक्तव्य

    रात्रीचे अकरा वाजले तरीही पालकमंत्र्यांसमवेत सोलापूर जिल्ह्यातील ऊस दराचा प्रश्न मिटेना.. बैठक सुरूच