भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद याने पुन्हा एकदा जागतिक बुद्धिबळ विश्वाला आपल्या असामान्य प्रतिभेची जाणीव करून दिली आहे. Norway Chess स्पर्धेत विद्यमान विश्वविजेता मॅग्नस कार्लसनचा पराभव करत प्रज्ञानंदने आणखी एक ऐतिहासिक कामगिरी आपल्या नावावर केली.
विशेष म्हणजे, गेल्या १९ वर्षांत मॅग्नस कार्लसनला दोन वेळा पराभूत करणारा प्रज्ञानंद हा पहिला बुद्धिबळपटू ठरला आहे. अत्यंत कमी वयात जागतिक स्तरावर सातत्याने अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या प्रज्ञानंदने मेहनत, एकाग्रता आणि आत्मविश्वासाच्या जोरावर भारताचा तिरंगा पुन्हा एकदा अभिमानाने उंचावला आहे.


