“न्याय फक्त झाला नाही, तर वेळेत झाला!”

“न्याय फक्त झाला नाही, तर वेळेत झाला!”

नसरापूरच्या निष्पाप चिमुरडीवर झालेल्या अमानुष अत्याचारानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. अशा वेळी मुख्यमंत्री Devendra Fadnavis जी यांनी स्पष्ट संदेश दिला होता की, अशा नराधमांना कोणतीही दया नाही आणि पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळालाच पाहिजे.

आज अवघ्या ५५ दिवसांत या प्रकरणाचा निकाल लागला. ही केवळ जलद न्यायप्रक्रिया नाही, तर सक्षम नेतृत्व, वेगवान तपास आणि न्यायव्यवस्थेच्या समन्वयाचे उत्कृष्ट उदाहरण आहे.

या प्रकरणात तपास यंत्रणांनी अत्यंत वेगाने काम केले. गुन्हा घडल्याच्या नंतर फक्त १५ दिवसांत तपास पूर्ण करून सुमारे १२०० पानी चार्जशीट न्यायालयात दाखल करण्यात आले. त्यासोबत ५५ पेक्षा अधिक साक्षीदारांचे जबाब, डीएनए अहवाल, सीसीटीव्ही फुटेज, न्यायवैद्यकीय आणि इतर वैज्ञानिक पुरावे सादर करण्यात आले. याच भक्कम पुराव्यांमुळे न्यायालयात खटल्याची सुनावणी वेगाने पार पाडली.

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पोलिस यंत्रणा, सरकारी वकील आणि प्रशासनाने कोणताही विलंब होऊ दिला नाही. प्रत्येक टप्प्यावर प्रकरणाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळाला आणि समाजातही ठाम संदेश गेला की महिला आणि बालकांवरील अत्याचार करणाऱ्यांना महाराष्ट्रात कायद्यापासून सुटका नाही.

पीडित कुटुंबाचे दुःख कोणताही निकाल भरून काढू शकत नाही. पण वेळेत मिळालेला न्याय हा न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करणारा असतो. नसरापूर प्रकरणातील ही वेगवान न्यायप्रक्रिया भविष्यात अशा गुन्हेगारांसाठी मोठा इशारा ठरेल आणि महाराष्ट्रात कायद्याचे राज्य अधिक मजबूत असल्याचा विश्वास जनतेमध्ये निर्माण करेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *