सोलापूरच्या सांस्कृतिक विकासाला नवी दिशा; प्रस्तावित आधुनिक नाट्यगृहाबाबत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न
ज्येष्ठ नाट्यकलावंत Prashant Damle यांच्या उपस्थितीत नाट्यगृहाच्या रचना, सुविधा आणि भविष्यातील नियोजनावर सविस्तर चर्चा
सोलापूर
सोलापूर महानगरपालिकेत आमदार सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत शहरातील अशोक नगर येथे प्रस्तावित आधुनिक नाट्यगृहाच्या उभारणीसंदर्भात विशेष बैठक पार पडली. यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष व ज्येष्ठ नाट्यकलावंत Prashant Damle यांनी नाट्यगृहाच्या रचना, आधुनिक सुविधा, तांत्रिक बाबी आणि भविष्यातील गरजा यावर मौल्यवान मार्गदर्शन केले.
प्रस्तावित नाट्यगृहामुळे सोलापूरमधील कलाकार, नाट्यप्रेमी आणि सांस्कृतिक चळवळीला आधुनिक व्यासपीठ उपलब्ध होणार असून शहराच्या सांस्कृतिक वैभवात मोलाची भर पडणार आहे. यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ![]()
![]()
