जळोलीतील बोअरवेल दुर्घटना; रात्रभर बचावकार्य, सकाळी चिमुकलीला बाहेर काढले; मात्र मृत्यूशी झुंज अपयशी

📍 पंढरपूर | २३ नोव्हेंबर

पंढरपूर तालुक्यातील जळोली येथे शेतातील बंद बोअरवेलमध्ये पडलेल्या दीड वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. रात्रभर प्रशासन आणि बचाव पथकांकडून युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले. सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास बालिकेला बोअरवेलमधून बाहेर काढण्यात यश आले; मात्र तोपर्यंत तिची प्राणज्योत मालवली होती. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

उष्मती राहुल गावित (वय दीड वर्षे, रा. शिसा, ता. धडगाव, जि. नंदुरबार) असे मृत बालिकेचे नाव आहे.

रविवारी (२२ नोव्हेंबर) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास जळोली येथील साखर कारखान्यालगत गोरख कांतिलाल नरसाळे यांच्या शेतातील बंद बोअरवेलमध्ये ऊसतोड मजूर कुटुंबातील उष्मती पडली होती. अंदाजे ४५ ते ५० फूट खोलवर ती अडकल्याची माहिती मिळताच प्रशासनाला घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे, करकंब पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, बीट अंमलदार, पोलीस पाटील तसेच दोन बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. रात्रभर बचावकार्य सुरू ठेवण्यात आले.

अखेर सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास बचाव पथकाला बालिकेला बोअरवेलमधून बाहेर काढण्यात यश आले. मात्र, तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. एका चिमुकलीच्या अशा दुर्दैवी मृत्यूमुळे जळोली परिसरासह सर्वत्र शोककळा पसरली आहे.

#जळोली#पंढरपूर#बोअरवेलदुर्घटना#SolapurNews#MH13News#BreakingNews

  • Related Posts

    *आयुष्मान भारत योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी रुग्णालयांनी सहभागी व्हावे* *-डॉ. ओमप्रकाश शेटे***पात्र रुग्णांना मोफत उपचार मिळण्यासाठी प्रशासन व रुग्णालयांनी समन्वयाने काम करावे; योजनेची व्याप्ती, उपचार पॅकेजेस आणि रुग्णालयांची संख्या वाढली**

    *आयुष्मान भारत योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी रुग्णालयांनी सहभागी व्हावे* *-डॉ. ओमप्रकाश शेटे***पात्र रुग्णांना मोफत उपचार मिळण्यासाठी प्रशासन व रुग्णालयांनी समन्वयाने काम करावे; योजनेची व्याप्ती, उपचार पॅकेजेस आणि रुग्णालयांची संख्या वाढली****सोलापूर, दि.…

    #ShivgangaTemple #Solapur #Kunkumarchan #KunkumarchanCeremony #ChandrashekharShivacharya #KashiPeeth #WomenParticipation #SpiritualEvent #ReligiousCeremony

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    *आयुष्मान भारत योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी रुग्णालयांनी सहभागी व्हावे* *-डॉ. ओमप्रकाश शेटे***पात्र रुग्णांना मोफत उपचार मिळण्यासाठी प्रशासन व रुग्णालयांनी समन्वयाने काम करावे; योजनेची व्याप्ती, उपचार पॅकेजेस आणि रुग्णालयांची संख्या वाढली**

    *आयुष्मान भारत योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी रुग्णालयांनी सहभागी व्हावे*           *-डॉ. ओमप्रकाश शेटे***पात्र रुग्णांना मोफत उपचार मिळण्यासाठी प्रशासन व रुग्णालयांनी समन्वयाने काम करावे; योजनेची व्याप्ती, उपचार पॅकेजेस आणि रुग्णालयांची संख्या वाढली**

    #ShivgangaTemple #Solapur #Kunkumarchan #KunkumarchanCeremony #ChandrashekharShivacharya #KashiPeeth #WomenParticipation #SpiritualEvent #ReligiousCeremony

    #ShivgangaTemple #Solapur #Kunkumarchan #KunkumarchanCeremony #ChandrashekharShivacharya #KashiPeeth #WomenParticipation #SpiritualEvent #ReligiousCeremony

    #JaykumarGore #SolapurDCCBank #DCCBankElection #SolapurPolitics #CooperativePolitics #PoliticalStatement #SeniorLeaders #MaharashtraPolitics #SolapurNews

    #RohitPawar #FarmersProtest #TractorMarch #Shegaon #Nagpur #WinterSession #FarmersIssues #MaharashtraPolitics #NCP #RohitPawarNews #FarmerProtest

    #RohitPawar #FarmersProtest #TractorMarch #Shegaon #Nagpur #WinterSession #FarmersIssues #MaharashtraPolitics #NCP #RohitPawarNews #FarmerProtest

    जळोलीतील बोअरवेल दुर्घटना; रात्रभर बचावकार्य, सकाळी चिमुकलीला बाहेर काढले; मात्र मृत्यूशी झुंज अपयशी

    जळोलीतील बोअरवेल दुर्घटना; रात्रभर बचावकार्य, सकाळी चिमुकलीला बाहेर काढले; मात्र मृत्यूशी झुंज अपयशी

    लिंगायत भवनच्या पूर्ततेसाठी घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांची मदत