आंबे विहीर दुर्घटनास्थळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांची धाव

#बचावकार्याचा घेतला आढावा; मृत कामगारांच्या नातेवाइकांशी संवाद साधत दिला धीर, एनडीआरएफचे पथकही दाखल होणार

पंढरपूर : प्रतिनिधी

#पंढरपूर तालुक्यातील आंबे येथे विहीर खोदकाम सुरू असताना मातीचा ढिगारा कोसळून चार कामगारांचा मृत्यू झालेल्या दुर्घटनास्थळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी सुरू असलेल्या बचावकार्याचा आढावा घेत संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्या. तसेच मृत कामगारांच्या नातेवाइकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.

#विहीर मालक दत्तात्रय निवृत्ती शिंदे यांच्या शेतात जेसीबीच्या साहाय्याने विहीर खोदण्याचे काम सुरू होते. सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास अचानक मातीचा मोठा ढिगारा कोसळला. या दुर्घटनेत मंगेश मोरे (वय ३५), सिद्धेश्वर घाडगे (वय ४५), आबासाहेब घोडके (वय ५०) आणि तानाजी घोडके (वय ५४) हे चार कामगार मातीखाली अडकले होते.

घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनासह विविध शासकीय यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन बचावकार्याची माहिती घेतली. अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना गती देण्याच्या दृष्टीने त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

यावेळी त्यांनी माती व दगडांच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांच्या नातेवाइकांशी संवाद साधत त्यांचे सांत्वन केले.

#बचावकार्य पंढरपूर नगरपालिकेचे अग्निशमन दल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि तालुका प्रशासनाच्या माध्यमातून सुरू होते. या कार्यासाठी एनडीआरएफचे पथकही बोलावण्यात आले होते.

#यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे, पंचायत समितीचे सभापती शुभम आगवणे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे, पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले आणि नायब तहसीलदार बालाजी पुदलवाड उपस्थित होते.

  • Related Posts

    सोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रस्त्यावर चूल पेटली; शेतकऱ्यांचा मुक्काम आंदोलनस्थळीच!

    स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ठिय्या आंदोलन रात्रीही सुरूच; नवीन जिल्हाधिकारी कार्यालय सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच घडली अशी घटना!

    ब्रेकिंग : सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ ऊसदरवाढीसाठी सुरू असलेलं आंदोलन स्थगित

    येत्या 19 तारखेला होणाऱ्या बैठकीत ऊसदर देण्याचं प्रशासनाच्या वतीने आश्वासन

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    सोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रस्त्यावर चूल पेटली; शेतकऱ्यांचा मुक्काम आंदोलनस्थळीच!

    सोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रस्त्यावर चूल पेटली; शेतकऱ्यांचा मुक्काम आंदोलनस्थळीच!

    ब्रेकिंग : सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ ऊसदरवाढीसाठी सुरू असलेलं आंदोलन स्थगित

    #लिंबू काढणी उपकरणाला भारत सरकारचे पेटंट; राहुरीच्या कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचे संशोधन यशस्वी!

    #लिंबू काढणी उपकरणाला भारत सरकारचे पेटंट; राहुरीच्या कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचे संशोधन यशस्वी!

    RBI ची मोठी कारवाई

    DCC बँक निवडणुकीतून अक्कलकोटचे नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, नागराज कुंभार यांची माघार!

    DCC बँक निवडणुकीतून अक्कलकोटचे नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, नागराज कुंभार यांची माघार!

    अनगरकर अजिंक्यराणा पाटील DCC (जिल्हा बँके)वर बिनविरोध ; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्वतः पेढा भरवून केलं अभिनंदन

    अनगरकर अजिंक्यराणा पाटील DCC (जिल्हा बँके)वर बिनविरोध ; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्वतः पेढा भरवून केलं अभिनंदन