ब्रेकिंग न्यूज

पंढरपुरात गोळीबार करून राजाभाऊ भिंगे यांची हत्या; मोटारसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांचा बेछूट गोळीबार

राहत्या घरातून बाहेर पडताच साधला निशाणा; नगरसेवक नामदेव भोईटे हत्या प्रकरणात भिंगे यांच्यावर होता आरोप

पंढरपूर : कार्तिक वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरात गोळीबाराची गंभीर घटना घडली आहे. शिवा संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष राजाभाऊ भिंगे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करून त्यांची हत्या केली. मंगळवारी रात्री सुमारे नऊच्या सुमारास इसबावी येथील त्यांच्या राहत्या घराजवळ हा प्रकार घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, राजाभाऊ भिंगे हे राहत्या घरातून बाहेर पडत असताना मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने लाईफलाइन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, नगरसेवक नामदेव भोईटे यांच्या हत्या प्रकरणात राजाभाऊ भिंगे यांच्यावर आरोप होता. या प्रकरणात ते सात ते आठ वर्षे कारागृहात होते. वर्षभरापूर्वी त्यांची कारागृहातून सुटका झाली होती. त्यानंतर त्यांनी शिवा संघटनेच्या माध्यमातून काम सुरू केले होते.

गोळीबाराच्या घटनेनंतर पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांकडून तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहेत.

कार्तिक वारीच्या तोंडावर घडलेल्या या गोळीबाराच्या घटनेने पंढरपूर शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

  • Related Posts

    सोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रस्त्यावर चूल पेटली; शेतकऱ्यांचा मुक्काम आंदोलनस्थळीच!

    स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ठिय्या आंदोलन रात्रीही सुरूच; नवीन जिल्हाधिकारी कार्यालय सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच घडली अशी घटना!

    ब्रेकिंग : सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ ऊसदरवाढीसाठी सुरू असलेलं आंदोलन स्थगित

    येत्या 19 तारखेला होणाऱ्या बैठकीत ऊसदर देण्याचं प्रशासनाच्या वतीने आश्वासन

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    सोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रस्त्यावर चूल पेटली; शेतकऱ्यांचा मुक्काम आंदोलनस्थळीच!

    सोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रस्त्यावर चूल पेटली; शेतकऱ्यांचा मुक्काम आंदोलनस्थळीच!

    ब्रेकिंग : सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ ऊसदरवाढीसाठी सुरू असलेलं आंदोलन स्थगित

    #लिंबू काढणी उपकरणाला भारत सरकारचे पेटंट; राहुरीच्या कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचे संशोधन यशस्वी!

    #लिंबू काढणी उपकरणाला भारत सरकारचे पेटंट; राहुरीच्या कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचे संशोधन यशस्वी!

    RBI ची मोठी कारवाई

    DCC बँक निवडणुकीतून अक्कलकोटचे नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, नागराज कुंभार यांची माघार!

    DCC बँक निवडणुकीतून अक्कलकोटचे नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, नागराज कुंभार यांची माघार!

    अनगरकर अजिंक्यराणा पाटील DCC (जिल्हा बँके)वर बिनविरोध ; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्वतः पेढा भरवून केलं अभिनंदन

    अनगरकर अजिंक्यराणा पाटील DCC (जिल्हा बँके)वर बिनविरोध ; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्वतः पेढा भरवून केलं अभिनंदन