मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानासाठी गावनिहाय सूक्ष्म नियोजन करा; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अभियान यशस्वी करण्याचे आवाहन; सर्व तालुक्यांच्या गटविकास अधिकारी व विभागप्रमुखांची आढावा बैठकीला उपस्थिती

सोलापूर : प्रतिनिधी

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान जिल्ह्यात यशस्वी करण्यासाठी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करावे. पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रत्येक गावात सूक्ष्म नियोजन करून निर्धारित कालावधीत उद्दिष्टपूर्ती करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी केले.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) सूर्यकांत भुजबळ उपस्थित होते.

या बैठकीत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील गावनिहाय अभियानाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. अभियानाची उद्दिष्टे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रत्येक तालुक्याने गावनिहाय कामांचे सूक्ष्म नियोजन करावे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना जैन यांनी दिल्या.

अभियानांतर्गत प्रत्येक गावातील कामांची सद्यस्थिती, प्रलंबित कामे, उद्दिष्टपूर्ती आणि त्यासाठी आवश्यक उपाययोजना यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून अभियानातील प्रत्येक घटक पूर्ण करण्यासाठी नियोजनबद्ध कार्यवाही करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या बैठकीस जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे गटविकास अधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

  • Related Posts

    दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर फुल स्टॉप- खासदार सुप्रिया सुळे यांचं महत्त्वाचं वक्तव्य..

    दिनविशेष

    शनिवार – १४ नोव्हेंबर २०२६ कार्तिक शु. ५ पूर्वाषाढा क्रांतिगुरू लहुजी साळवे जयंती पांडव पंचमी / ज्ञान पंचमी ( जैन)

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानासाठी गावनिहाय सूक्ष्म नियोजन करा; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

    मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानासाठी गावनिहाय सूक्ष्म नियोजन करा; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

    दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर फुल स्टॉप- खासदार सुप्रिया सुळे यांचं महत्त्वाचं वक्तव्य..

    दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर फुल स्टॉप- खासदार सुप्रिया सुळे यांचं महत्त्वाचं वक्तव्य..

    भारताने अंडर 19 आशिया कप जिंकला

    भारताने अंडर 19 आशिया कप जिंकला

    Suvichar – नाती जीवंतपणीच संभाळा ताजमहल जगाने पाहिला पण मुमताजने नाही.

    Dinvishesh