मोठी बातमी | यंदाचा गणेशोत्सव संपूर्ण डीजेमुक्त!

🚨 मोठी बातमी | यंदाचा गणेशोत्सव संपूर्ण डीजेमुक्त!

‘डीजे’ला नो एंट्री; सोलापूरचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांचा स्पष्ट इशारा!

सोलापूर | प्रतिनिधी

यंदाचा गणेशोत्सव डीजेमुक्त पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय सोलापूर शहरात घेण्यात आला आहे. शांतता समितीच्या बैठकीत या निर्णयाला शहरातील नऊ मध्यवर्ती गणेश मंडळांनी एकमुखी पाठिंबा दिला.

गणेशोत्सवातील मिरवणुकांमध्ये डीजे वाजविण्यास परवानगी दिली जाणार नाही, तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे.

दरम्यान, १३ ते २६ सप्टेंबरदरम्यान डॉल्बी सिस्टीम आणि लेझर लाईटवरही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र १४, २४ आणि २५ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत पारंपरिक वाद्ये आणि साधे ध्वनिक्षेपक वापरण्यास मुभा देण्यात आली आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *