‘एकता महिला मंच’चा सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम…

पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधन उत्साहात साजरा.

​अहोरात्र नागरिकांच्या सुरक्षेसाठी व रक्षणासाठी तत्पर असणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘एकता महिला मंच’च्या वतीने एक विशेष व स्नेहपूर्ण उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. आज, दिनांक २९ ऑगस्ट २०२६ रोजी पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला.

​या प्रसंगी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी आवर्जून उपस्थित होते.सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या कौतुकास्पद उपक्रमासाठी ‘एकता महिला मंच’च्या प्रमुख पदाधिकारी आणि सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *