#पंढरपूर |

आधी रचिली पंढरी। मग वैकुंठ नगरी

जेव्हा नव्हते चराचर। तेव्हा होते पंढरपूर …

शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांनी आषाढी वारीनिमित्त आज पंढरपुरात जाऊन जिल्हा प्रशासनाने केलेल्या सोयी सुविधांचा आढावा घेतला. स्वच्छ, सुंदर, निर्मळ आणि आरोग्यदायक वारी व्हावी. यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यानिमित्ताने पंढरपुरातील ६५ एकर, पत्राशेड दर्शन रांग, चंद्रभागा नदीच्या पात्रात केलेल्या सोयीसुविधा, भक्ती सागर येथे वारकऱ्यांसाठी उभारण्यात आलेले आयसीयू सेंटर यांची पाहणी शिंदे साहेबांनी केली. तसेच चंद्रभागा नदीत बोटीतून फेरफटका मारून ठिकठिकाणी केलेल्या सोयी सुविधांचा आढावा घेतला.

बहुतांश तयारी ही समाधानकारक झाली असली, तरीही अतिरीक्त गरज लागल्यास मुंबई – पुण्यातील मनपा कडून सक्षन मशीनची मागणी करावी, ३०० अतिरिक्त कंत्राटी स्वच्छता कामगार तैनात करावे, चंद्रभागेच्या तीरावर महिला आणि पुरुषांसाठी अतिरिक्त कपडे बदलण्याच्या शेड बांधाव्या, निधीची कमतरता जाणवल्यास त्याची मागणी करावी नगरविकास विभागाकडून त्याची पूर्तता केली जाईल असेही यावेळी शिंदे साहेबांनी स्पष्ट केले.

याप्रसंगी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, गृह राज्यमंत्री योगेश कदम, आमदार तानाजी सावंत, आमदार समाधान अवताडे, आमदार राजू खरे, आमदार अभिजित पाटील, सोलापूरचे जिल्हाधिकारी एस.कार्तिकेयन, आरोग्यदूत मंगेश चिवटे, शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे, जिल्हापरिषद सदस्य चरणराज चवरे, शिवसेना पदाधिकारी तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *