रात्री बंद घर फोडून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; 156.5 ग्रॅम सोने व 10.63 लाखांचा मुद्देमाल जप्त

रात्री बंद घर फोडून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; 156.5 ग्रॅम सोने व 10.63 लाखांचा मुद्देमाल जप्त

सोलापूर, दि. 29 जून : सोलापूर शहर गुन्हे शाखेने घरफोडीच्या गंभीर गुन्ह्याचा यशस्वी तपास करत सराईत आरोपींच्या टोळीला जेरबंद केले आहे. या कारवाईत चोरीस गेलेल्या 156.5 ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेले साहित्य असा एकूण 10 लाख 63 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कल्याण नगर भाग-2 येथे 25 मे 2026 रोजी रात्री बंद घराचे मुख्य दरवाजाचे लॉक तोडून घरात प्रवेश करण्यात आला होता. चोरट्यांनी कपाटातील 217 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 1 लाख 20 हजार रुपयांची रोकड असा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त (गुन्हे/विशेष शाखा) डॉ. अश्विनी पाटील आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे शाखेने तपास सुरू केला.

तपासादरम्यान विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी सुरजितसिंग राजपालसिंग टाक (रा. हडपसर, पुणे) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने साथीदार मंजित कुमार (रा. रायबरेली, उत्तर प्रदेश) याच्यासह घरफोडी केल्याची कबुली दिली.

चोरीतील दागिने आरोपींनी लक्ष्मण गणेश रणशिंगे व संतोष विलास सावळे यांना विकल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडून 155 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. तसेच चोरीचे दागिने असल्याची माहिती असूनही ते खरेदी करणारा सराफ व्यावसायिक अब्दुल वहीद अब्दुल कादर शेख यालाही अटक करण्यात आली.

या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन

पोलीस आयुक्त एम. राजकुमार

पोलीस उपायुक्त (गुन्हे/विशेष शाखा) डॉ. अश्विनी पाटील

सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) दिलीप पवार

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने

सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर

तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी

पोलीस अंमलदार जावेद जमादार, विनोद रजपूत, इझाम जमादार, धीरज सातपुते, उमेश पवार, सुभाष मुंडे, वसीम शेख, काशिनाथ वाघे, आबा सावळे, सैफन सय्यद, विठ्ठल येलमार, राजू मोरे, सिद्धराम देशमुख, अजय गुंड, अंकुश भोसले, बापू साठे, महेश शिंदे, अनिल जाधव, महेश रोकडे, रोलेरा बुगाड तसेच सायबर पोलीस स्टेशनचे प्रकाश गायकवाड, मल्हिंद्र राठोड, चालक सतीश काटे, बाळासाहेब काळे आणि मारुती धोरपडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

Solapur Municipal Corporation, Solapur
Solapur City Police
Zilla Parishad Solapur
Solapur Rural Police
Jaykumar Gore
CMOMaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *