आज श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त सोलापूर शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी महापौर श्री. विनायक कोंड्याल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री दीपक वैद्य, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्री इंद्रजीत पवार, सभागृह नेते श्री नरेंद्रजी काळे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, शहराध्यक्ष तथा नगरसेविका रोहिणी तडवळकर,भाजपचे सोलापूर जिल्हा पश्चिम अध्यक्ष श्री चेतनसिंह केदार, नगरसेवक विनोद भोसले, मध्यवर्ती महामंडळाचे श्री पद्माकर नाना काळे, श्री मनीष देशमुख, श्री नागेश खरात,श्री जयवंत सलगर, श्री अंबादास शेळके, श्री बजरंग जाधव,श्री प्रकाश ननवरे, श्री सदाशिव पवार, श्री विजय पुकाळे,श्री किरण भंडारी, श्री देविदास घुले, यांच्यासह विविध मान्यवर, पदाधिकारी व शिवप्रेमी उपस्थित होते.


