ढोल ताशांचा गजर : पालकमंत्री जयकुमार गोरे, खा. धैर्यशील माने, खा. डॉ. ज्योती वाघमारे, आ. विजयकुमार देशमुख यांची प्रमुख उपस्थिती
सोलापूर : प्रतिनिधी
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या ३५२ व्या श्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सुवर्ण गणपती युवक प्रतिष्ठान, हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान आणि छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा समिती यांच्यातर्फे राज्याभिषेक कार्यक्रम उत्साहात करण्यात आला. शिवस्मारक येथे हा कार्यक्रम झाला.
प्रारंभी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठित मूर्तीस राज्याभिषेक करण्यात आला. यानंतर छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्ती पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आणि श्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सर्वांना मिठाई वाटून आनंदोत्सव करण्यात आला. किरण जोशी यांनी पौरोहित्य केले.
श्री शिवराज्याभिषेक सोहळ्यास पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार धैर्यशील माने, खासदार डॉ. ज्योती वाघमारे, आमदार विजयकुमार देशमुख, महापौर विनायक कोंड्याल, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समितीच्या सभापती रंजिता चाकोते, इंडियन मॉडेल स्कूलचे अमोल जोशी, भारतीय जनता पार्टीच्या शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, नगरसेवक प्रियदर्शन साठे, सोलापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रमुख सल्लागार दास काका शेळके माजी नगरसेवक गुरशांत धुत्तरगावकर क्रांतीतालीम तरुण मंडळाचे ज्ञानेश्वर आप्पा सपाटे श्रीकांत घाडगे, संयोजक बाळासाहेब गायकवाड, अंबादास गोरंटला, हिंदूराष्ट्र सेनेचे शहर अध्यक्ष रवी गोणे, आनंद मुसळे…… आदी उपस्थित होते.


