सोलापूर विधान परिषद निवडणूक 2026 : पहिल्याच दिवशी 13 उमेदवारी अर्ज दाखल

सोलापूर, दि. 1 जून : विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक 2026 साठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी एकूण 13 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत.

भारतीय जनता पक्षाकडून सर्वाधिक 4 अर्ज, तर न्यू राष्ट्रीय समाज पार्टी, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार), शिवसेना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांच्याकडून प्रत्येकी 1 अर्ज दाखल करण्यात आला आहे. तसेच 4 अपक्ष उमेदवारांनी देखील उमेदवारी अर्ज सादर केले आहेत.

उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या प्रमुख उमेदवारांमध्ये राजेंद्र राऊत, अशोक वाघमोडे, जीवन जानकर, वसंतराव दौलतराव देशमुख, महेश साठे, रमेश बारस्कर, नागेश अक्कलकोटे, आदित्य फत्तेपूरकर आणि धनंजय डिकोळे यांचा समावेश आहे. निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *